आस्थापना व मानव विकास विभाग

“छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे” या कंपनीचे दिनांक 25 जून, 2018 रोजी कंपनी अधिनियम 2013 च्या कलम 8 अन्वये नोंदणी करण्यात आली आहे. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी या कंपनीची महाराष्ट्र शासनाने स्थापना केली असून ही संस्था दिनांक 11/02/2019 रोजी पासून कार्यान्वित झाली आहे.

“छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे” या कंपनीच्या Memorandum of Association व Article of Association प्रमाणे जबाबदारी पार पडण्याकरिता त्वरित आवश्यक व्यवस्था होण्याकरिता “निबंधक” व “लेखाधिकारी” ही पदे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या दिनांक 15/11/2018 च्या शासन निर्णयान्वये तसेच “व्यवस्थापकीय संचालक” हे पद सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या दिनांक 01/01/2019 च्या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आले आहे.

“छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे” मार्फत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजनांची कालबद्ध तऱ्हेने व प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचारीवृंद मिळून 41 पदे निर्माण करण्यास वित्त विभाग अधिनस्त “उच्चाधिकार सचिवसमिती” कडून मान्यता देण्यात आली. त्याअनुषंगाने “छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे” या कंपनीसाठी 41 नवीन पदे निर्माण करण्यास नियोजन विभागाच्या दिनांक 04/05/2021 च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

नियमित पदे

अ.क्र. नियमित पदे पदसंख्या
1 वरिष्ठ प्रकल्प संचालक (सांख्यिकी व मुल्यमापन) 1
2 वरिष्ठ प्रकल्प संचालक (शिक्षण) 1
3 वरिष्ठ प्रकल्प संचालक (कृषी) 1
4 वरिष्ठ प्रकल्प संचालक (कौशल्य विकास) 1
5 वरिष्ठ प्रकल्प संचालक (समाज कल्याण) 1
6 सहाय्यक लेखाधिकारी 1
7 संशोधन अधिकारी 2
8

बाह्ययंत्रणेमार्फत घ्यावयाच्या सेवा

अ.क्र. पदनाम मंजूर पदे
1 प्रकल्प संचालक 2
2 कंपनी सेक्रटरी 1
3 प्लेसमेंट अधिकारी / औद्योगिक समन्वय अधिकारी 1
4 ग्रंथपाल 1
5 स्थावर व्यवस्थापक / कनिष्ठ अभियंता 1
6 संगणक कनिष्ठ सल्लागार 1
7 प्रकल्प अधिकारी 2
8 स्वीय सहा. तथा लघुलेखक 1
9 संगणक अभियंता 2
10 वरिष्ठ लिपीक 1
11 लेखा सहाय्यक 1
12 कनिष्ठ सहाय्यक 8
13 डेटा एन्ट्री ऑपरेटर 3
14 वाहन चालक 3
15 माळी 1
16 शिपाई / परिचर 3
17 सफाई कर्मचारी 1
33