MPSC Subordinate Services (Non-gazetted) Group-B (PSI, STI,ASO) Free Online Training

उपक्रम उद्देश :

सारथी पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्र राज्यसेवा आयोग मार्फत (PSI, STI, ASO) या अराजपत्रित परीक्षेच्या तयारी साठी MPSC- महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) (पूर्व) व (मुख्य) स्पर्धा परीक्षेकरिता प्रशिक्षण प्रायोजित केले जाते.

उपक्रमाचे स्वरूप :

ऑनलाईन

प्रशिक्षण ठिकाण :

पुणे (ऑनलाईन)- Virtual Classroom द्वारे प्रक्षेपित

लाभार्थी संख्या :

किमान 500

लाभार्थी पात्रता :

शैक्षणिक पात्रता :

  • अर्जदार कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा तसेच महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) (पूर्व) व (मुख्य) परीक्षा देणे करिता पात्र असावा.

वयोमर्यादा :

  • ASO , STI – किमान 18 वर्ष व कमाल 38 वर्षे,

  • PSI – किमान 19 वर्ष व कमाल 31 वर्षे

महत्त्वाची अर्हता :

  • अर्जदार हा महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या प्रवर्गातील असावा. (सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेला जातीचा दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे)

  • उमेदवाराच्या नावाचे सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले Non-creamy layer/ उत्पन्नाचे प्रमाणपत्र/ EWS प्रमाणपत्र आवश्यक आहे.

  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. आठ लाखापेक्षा जास्त नसावे.

  • अर्जदार कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधारक असावा तसेच महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) परीक्षा देणे करिता पात्र असावा.

  • सारथी, पुणे मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही उपक्रमांचा या अगोदर लाभ घेतलेला नसावा /घेत नसावा.

  • इतर कोणत्याही शासकीय/निमशासकीय खाजगी संस्थाकडून या प्रशिक्षणाकरिता लाभ घेतलेला नसावा/घेत नसावा.

आवश्यक कागदपत्रे :

  • जातीचा दाखला /शाळेचा दाखला/EWS प्रमाणपत्र

  • नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र / उत्पन्नाचे प्रमाणपत्र (Income Certificate)

  • रहिवासी दाखला

  • पदवी प्रमाणपत्र

  • दहावी बोर्डचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला

  • आधार कार्ड, PAN कार्ड

प्रशिक्षण कालावधी :

  • अंदाजे सहा महिने (ASO, STI साठी लेखी व मुख्य परीक्षापूर्व प्रशिक्षण/ PSI साठी लेखी, मुख्य व मुलाखत परीक्षापूर्व प्रशिक्षण )

लाभार्थी निवड प्रक्रिया :

  • उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी कॉल फॉर अप्लिकेशन (Call for application) द्वारे उमेदवारांचे ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म ( Online Application Form) ची लिंक, मार्गदर्शक सूचना, हमीपत्र व जाहिरात सारथी पुणे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल तसेच कॉल फॉर अप्लिकेशनची जाहिरात स्थानिक वृत्तपत्रातुन देण्यात येईल.

  • उमदेवारांना अर्ज करण्यासाठी एक ते दीड महिना मुदत देण्यात येईल.

  • अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापासुन 10 दिवसाच्या आत कागदपत्र पडताळणी पुर्ण केली जाईल. त्यानंतर 10 दिवसाच्या आत विद्यार्थ्याची प्रवेश प्रक्रिया पुर्ण करण्यात येईल.

  • अर्जदारांची रांची कागदपत्रे पडताळणी करून लक्षित गटातील पात्र उमेदवरांना नि:शुल्क ऑनलाईन कोचिंग देण्यात येईल.

लाभाचे स्वरूप :

  • लक्षित गटातील पात्र उमेदवांराना सारथी मार्फत निवडण्यात आलेल्या तज्ञ मार्गदर्शक यांच्याकडून नि:शुल्क ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येते.

  • पात्र उमेदवारांना या उपक्रमामार्फत कोणताही इतर लाभ अनुज्ञेय नाही.

Virtual Classroom Setup & तज्ञ मार्गदर्शक निवड :

  • सारथी पुणे संकेतस्थळावर दरपत्रक मागविण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करून दरपत्रके मागवून सर्वात कमी (L१) दर असणाऱ्या Virtual Class Room Setup ची निवड प्रशिक्षणाचे प्रक्षेपण करण्यासाठी निवड करण्यात येईल. Virtual Class Room असलेल्या संस्था व सारथी पुणे यांच्यामध्ये करारनामा करण्यात येईल.

  • तज्ञ मार्गदर्शक यांचे आवेदन अर्ज मागवून त्यांची कागदपत्रे पडताळणी व मुलाखती द्वारे अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक यांची निवड केली जाईल. तज्ञ शिक्षक मार्फत वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांना Virtual Classroom द्वारे ऑनलाईन प्रशिक्षणाचे प्रक्षेपण केले जाईल.

  • पात्र विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण चालू असताना तसेच पूर्ण झाल्यानंतर Interactive E-Application द्वारे चाचणी घेण्यात येईल.

प्रशिक्षणाचे टप्पे :

  • महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) (पूर्व) व (मुख्य) स्पर्धा परीक्षेकरिता परीक्षापूर्व तयारीसाठी टप्प्यांमध्ये प्रशिक्षण न देता, एकत्रितपणे सलग प्रशिक्षण दिले जाईल.

खालील बाबी आढळल्यास अर्जदार प्रवेशासाठी अपात्र ठरेल.

  • अपूर्ण कागदपत्रे विहित मुदतीत सादर न करणे.
  • अर्ज भरताना खोटी किंवा चुकीची माहिती भरणे.
  • इतर शासकीय/निमशासकीय/खाजगी, स्वायत्त संस्था याच्याकडून लाभ घेतल्यास उमेदवार अपात्र ठरतो.
  • वयोगटात बसत नसल्यास
  • सारथीच्या इतर उपक्रमाचा लाभ घेतला असल्यास
  • शिस्तभंग/नियमांचे उल्लंघन केल्यास
प्रशिक्षण कालावधी व टप्पे, प्रवेश प्रक्रिया निकष, Virtual Class Room व तज्ञ शिक्षक निवड प्रक्रिया निश्चित करण्याचा अंतिम अधिकार हा मा. व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे यांच्याकडे राहील.