Police Pre-Recruitment Written Exam Free Online Coaching

उपक्रम उद्देश :

महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गातील उमेदवांराना पोलीस सेवेत काम करण्याची संधी मिळावी या करिता सारथी पुणे मार्फत लक्षित गटातील उमेदवारांना पोलीस भरतीपूर्व लेखी परीक्षा नि:शुल्क ऑनलाईन प्रशिक्षण प्रायोजित केले जाते.

उपक्रमाचे स्वरूप :

ऑनलाईन

प्रशिक्षण ठिकाण :

पुणे (ऑनलाईन)- Virtual Classroom द्वारे प्रक्षेपित

लाभार्थी संख्या :

किमान 5000

लाभार्थी पात्रता :

शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण असावा. वयाची अट : किमान 18 वर्ष व कमाल २८ वर्षे,

महत्त्वाची अर्हता :

  • अर्जदार हा महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या प्रवर्गातील असावा. (सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेला जातीचा दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे)

  • उमेदवाराच्या नावाचे सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले Non-creamy layer/ उत्पन्नाचे प्रमाणपत्र/ EWS प्रमाणपत्र आवश्यक आहे.

  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. आठ लाखापेक्षा जास्त नसावे.

  • अर्जदार कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधारक असावा तसेच पोलीस भरतीपूर्व लेखी परीक्षा देणे करिता पात्र असावा.

  • सारथी, पुणे मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही उपक्रमांचा या अगोदर लाभ घेतलेला नसावा /घेत नसावा.

  • इतर कोणत्याही शासकीय/निमशासकीय खाजगी संस्थाकडून या प्रशिक्षणाकरिता लाभ घेतलेला नसावा/घेत नसावा.

आवश्यक कागदपत्रे :

  • जातीचा दाखला / शाळेचा दाखला/ EWS प्रमाणपत्र

  • नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र / उत्पन्नाचे प्रमाणपत्र (Income Certificate)

  • रहिवासी दाखला

  • 12 वी प्रमाणपत्र

  • दहावी बोर्डचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला

  • आधार कार्ड, PAN कार्ड

प्रशिक्षण कालावधी :

  • किमान 3 महिने

लाभार्थी निवड प्रक्रिया :

  • उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी कॉल फॉर अप्लिकेशन (Call for application) द्वारे उमेदवारांचे ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म (Online Application Form) ची लिंक, मार्गदर्शक सूचना, हमीपत्र व जाहिरात सारथी पुणे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल व त्यासंबंधी जाहिरात स्थानिक वृत्तपत्रातुन देण्यात येईल.

  • उमदेवारांना अर्ज करण्यासाठी एक ते दीड महिना मुदत देण्यात येईल.

  • अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापासुन 10 दिवसाच्या आत कागदपत्र पडताळणी पुर्ण केली जाईल. त्यानंतर 10 दिवसाच्या आत विद्यार्थ्याची प्रवेश प्रक्रिया पुर्ण करण्यात येईल.

  • अर्जदारांची कागदपत्रे पडताळणी करून लक्षित गटातील पात्र उमेदवारांना नि:शुल्क ऑनलाईन कोचिंग देण्यात येईल.

लाभाचे स्वरूप :

  • लक्षित गटातील पात्र उमेदवांराना सारथी मार्फत निवडण्यात आलेल्या तज्ञ मार्गदर्शकांकडून Virtual Classroom द्वारे नि:शुल्क ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येते.

  • लक्षित गटातील पात्र उमेदवारांना या उपक्रमामार्फत कोणताही इतर लाभ अनुज्ञेय नाही.

    Virtual Classroom Setup & तज्ञ मार्गदर्शक निवड :

  • सारथी पुणे संकेतस्थळावर दरपत्रक मागविण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करून दरपत्रके मागवून सर्वात कमी (L१) दर असणाऱ्या Virtual Class Room Setup ची निवड प्रशिक्षणा करिता केली जाईल.

  • तज्ञ मार्गदर्शक यांचे आवेदन अर्ज मागविण्यात येतील. प्राप्त आवेदन अर्जानुसार सदर सर्व उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी व मुलाखती द्वारे अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक यांची निवड केली जाईल.

प्रशिक्षणाचे टप्पे :

  • किमान 3 महिने परीक्षापूर्व प्रशिक्षण दिले जाईल.

खालील बाबी आढळल्यास अर्जदार प्रवेशासाठी अपात्र ठरेल.

  • अपूर्ण कागदपत्रे विहित मुदतीत सादर न करणे.

  • अर्ज भरताना खोटी किंवा चुकीची माहिती भरणे.

  • इतर शासकीय/निमशासकीय/खाजगी, स्वायत्त संस्था याच्याकडून लाभ घेतल्यास उमेदवार अपात्र ठरतो.

  • वयोगटात बसत नसल्यास

  • सारथीच्या इतर उपक्रमाचा लाभ घेतला असल्यास

  • नियमांचे उल्लंघन केल्यास

प्रशिक्षण कालावधी व टप्पे, प्रवेश प्रक्रिया निकष, virtual Class Room व तज्ञ मार्गदर्शक निवड प्रक्रिया निश्चित करण्याचा अंतिम अधिकार हा मा. व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे यांच्याकडे राहील.