UGC-NET/CSIR-UGC-NET/MH-SET Free Online Training Initiative

उपक्रमाचा उद्देश :

देशात व राज्यात स्थित महाविद्यालये व विद्यापीठ येथे सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदाकरिता SET/ UGC-NET / CSIR-UGC-NET उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परिक्षांचा निकाल सरासरी 05 टक्क्यांपेक्षाही कमी लागतो. उमेदवार UGC-NET/ CSIR-UGC-NET उत्तीर्ण असल्यास, त्यांना IIM व इतर मान्यताप्राप्त विद्यापिठामध्ये Ph. D. करण्याकरिता प्रवेश परीक्षा (Entrance Exam) देण्यापासून सूट मिळते. Ph. D. करण्यासाठी UGC / शासनाच्या कोणत्याही संस्था कडून अधिछात्रवृत्ती मिळविण्यासाठी SET/ UGC-NET / CSIR-UGC-NET परीक्षा उत्तीर्ण असणे बाबतचे सुधारित निकष लागू झाले आहेत. UGC-NET/ CSIR-UGC-NET परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता, सारथी पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गातील लक्षित गटातील उमेदवारांना UGC-NET/CSIR-UGC-NET/MH-SET स्पर्धा परिक्षापूर्व निःशुल्क ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येईल.

उपक्रमाचे स्वरूप :

ऑनलाईन

प्रशिक्षण ठिकाण :

पुणे (ऑनलाईन)- Virtual Classroom द्वारे प्रक्षेपित

लाभार्थी संख्या :

1500

लाभार्थी पात्रता :

  • अर्जदार हा महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या प्रवर्गातील असावा. (सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेला जातीचा दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे)

  • उमेदवाराच्या नावाचे सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले Non-creamy layer/ उत्पन्नाचे प्रमाणपत्र/ EWS प्रमाणपत्र आवश्यक आहे.

  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. आठ लाखापेक्षा जास्त नसावे.

  • अर्जदार कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधारक असावा तसेच UGC-NET/CSIR-UGC-NET/MH-SET परीक्षा देणे करिता पात्र असावा.

  • सारथी, पुणे मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही उपक्रमांचा या अगोदर लाभ घेतलेला नसावा /घेत नसावा.

  • इतर कोणत्याही शासकीय/निमशासकीय खाजगी संस्थाकडून या प्रशिक्षणाकरिता लाभ घेतलेला नसावा/घेत नसावा.

आवश्यक कागदपत्रे :

  • जातीचा दाखला /शाळेचा दाखला

  • नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र / उत्पन्नाचे प्रमाणपत्र (Income Certificate)

  • रहिवासी दाखला

  • पदवीत्युर पदवी प्रमाणपत्र

  • दहावी बोर्डचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला

  • आधार कार्ड, PAN कार्ड

  • ४ पासपोर्ट साईज फोटो

  • हमीपत्र

  • मॉडेल कोड ऑफ कंडक्ट

प्रशिक्षण कालावधी :

  • 3 महिने / 5 महिने

लाभार्थी निवड प्रक्रिया :

  • उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी Call for Student Application जाहिरातीद्वारे उमेदवारांचे ऑनलाईन अर्जकरिता (Online Application Form) ची लिंक, मार्गदर्शक सूचना व जाहिरात सारथी, पुणे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल व त्याची जाहिरात स्थानिक वृत्तपत्रातुन देण्यात येईल.

  • उमदेवारांना अर्ज भरण्यासाठी एक ते दीड महिना मुदत देण्यात येईल.

  • अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापासुन 10 दिवसाच्या आत कागदपत्र पडताळणी पूर्ण केली जाईल. त्यानंतर 10 दिवसाच्या आत विद्यार्थ्याची प्रवेश प्रक्रिया पुर्ण करण्यात येईल.

  • अर्जदारांची कागदपत्रे पडताळणी करून लक्षित गटातील पात्र उमेदवारांना नि:शुल्क ऑनलाईन कोचिंग देण्यात येते.

लाभाचे स्वरूप

  • पात्र उमेदवारांनी प्रवेश घेतलेल्या नामांकित कोचिंग संस्थाचे कोचिंग शुल्क सदर संस्थांना सारथी पुणे मार्फत अदा करण्यात येते.

  • कोचिंग शुल्क व्यतिरिक्त इतर कोणताही लाभ उमेदवारांना अनुज्ञेय नाही.

कोचिंग संस्थाची निवड :

  • ई-टेंडर द्वारे UGC-NET /MH-SET स्पर्धा परीक्षा ऑनलाईन कोचिंग देणाऱ्या कोचिंग संस्थाची ची निवड केली जाईल.
  • संस्था व सारथी पुणे यांच्यात करारनामा करण्यात येईल.
  • Empanelled संस्थापैकी आवड व गरजेप्रमाणे विद्यार्थी स्वत: निवड करू शकतो.
  • ई-टेंडर द्वारे कागदपत्रे पडताळणी करणारी बाहयस्त्रोत संस्था निवड करणे करिता सारथी पुणे संकेतस्थळावर जाहिरात, अटी व शर्ती, मार्गदर्शक सूचना प्रसिध्द करण्यात येईल व त्याची जाहिरात (DGIPR दराने) स्थानिक वृत्तपत्रात देण्यात येईल.
  • किंवा
  • दरपत्रक द्वारे Virtual Classroom ची निवड केली जाईल.
  • विषय नुसार आवश्यक तज्ञ मार्गदर्शक यांचे आवेदन अर्ज जाहिरातीद्वारे मागवून तज्ञ शिक्षक यांची निवड करून विद्यार्थ्यांना Virtual Classroom द्वारे ऑनलाईन प्रशिक्षणाचे प्रक्षेपण केले जाईल.
  • पात्र विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण चालू असताना तसेच पूर्ण झाल्यानंतर Interactive E-Application द्वारे चाचणी घेण्यात येईल.

हमीपत्र व मॉडेल कोड ऑफ कंडक्ट (Model Code of Conduct) :

  • लक्षित गटातील विद्यार्थ्याने सारथी पुणे मार्फत प्रायोजित विविध स्पर्धा परीक्षेच्या कोचिंग करिता उपलब्ध करून दिलेल्या उचित संधीचा लाभ घेणे अपेक्षित आहे व सारथी च्या नियमांचे व प्रशिक्षणा दरम्यान शिस्तीचे पालन करावे यासाठी हमीपत्र व मॉडेल कोड ऑफ कंडक्ट (Model Code of Conduct) विद्यार्थ्याकडून प्रवेश घेतेवेळी भरून घेतले जाते. उपक्रमात प्रवेश निश्चित झाल्यानंतर, पात्र विद्यार्थ्यांला प्रवेश पत्र दिले जाईल.

  • विद्यार्थ्याकडून प्रवेश घेतेवेळेस हमीपत्र भरून घेतले जाईल की, विद्यार्थी प्रवेश घेतल्यानंतर कोचिंगद्वारे घेण्यात येणाऱ्या सर्व चाचणी, ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता हजर राहील तसेच प्रशिक्षण पूर्ण करणार व कोणत्याही परिस्थितीत कोचिंग अर्धवट सोडणार नाही, कोचिंग अपूर्ण सोडल्यास सारथी, पुणे संस्थेने केलेला सर्व खर्च वसूल केला जाईल.

खालील बाबी आढळल्यास अर्जदार प्रवेशासाठी अपात्र ठरेल.:

  • सारथी च्या उपक्रमातील लाभार्थी निवड निकषनुसार (लक्षित गट/ शैक्षणिक अर्हता/वयोगट) अर्जदार अपात्र असल्यास

  • अपूर्ण कागदपत्रे/ विहित मुदतीत कागदपत्रे सादर न करणे

  • अंतिम मुदतीनंतर अर्ज (ऑनलाईन/ऑफलाईन) करणे

  • अर्ज भरताना खोटी किंवा चुकीची माहिती भरणे

  • इतर शासकीय/निमशासकीय/खाजगी, स्वायत्त संस्था याच्याकडून लाभ घेतलेला असल्यास/घेत असल्यास उमेदवार अपात्र ठरतो. (No Dual Beneficiary)

  • सारथीच्या इतर उपक्रमाचा लाभ घेतलेला असल्यास/घेत असल्यास

  • सारथी संस्थेच्या नियमांचे उल्लंघन /शिस्तभंग केल्यास

प्रशिक्षणाचे स्वरूप (ऑनलाईन /ऑफलाईन), प्रशिक्षण कालावधी व टप्पे, प्रवेश प्रक्रिया निकष, कोचिंग वर्ग निवड प्रक्रिया, आर्थिक सहाय्याचे स्वरूप निश्चित करण्याचा अंतिम अधिकार हा मा. व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे यांच्याकडे राहील.