UPSC Interview Sponsorship Program

उपक्रमाचा उद्देश :

UPSC मुख्य (Mains) परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना UPSC मुलाखत/ व्यक्तिमत्व चाचणीच्या पूर्व तयारीकरिता एकवेळ एकरकमी रू.25,000/- आर्थिक सहाय्य सारथी पुणे मार्फत अदा करण्यात येईल.

UPSC मुलाखत/व्यक्तिमत्व चाचणीच्या पूर्व तयारीकरिता एकरकमी आर्थिक सहाय्य हे विनाहजेरी विद्यार्थ्यांच्या खात्यावर NEFT/RTGS द्वारे अदा करण्यात येईल.

लाभार्थी संख्या :

सारथी संस्थेमार्फत मागविण्यात आलेल्या मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारातून पात्र ठरलेल्या लक्षित गटातील सर्व उमेदवारांना आर्थिक सहाय्य दिले जाते.

लाभार्थी पात्रता/निकष :

  • अर्जदार हा महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या प्रवर्गातील असावा. (सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेला जातीचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे)

  • उमेदवाराच्या नावाचे सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले Non-creamy layer/ उत्पन्नाचे प्रमाणपत्र/ EWS प्रमाणपत्र आवश्यक आहे.

  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.आठ लाखापेक्षा जास्त नसावे.

  • उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासीअसावा.

  • उमेदवाराकडे UPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण असल्याचा व UPSC मुलाखत/व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेस पात्र असल्याचा पुरावा असावा.

आवश्यक कागदपत्रे :

  • जातीचा दाखला /शाळेचा दाखला

  • नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र / उत्पन्नाचे प्रमाणपत्र (Income Certificate)/ EWS प्रमाणपत्र

  • रहिवासी दाखला

  • पदवी प्रमाणपत्र

  • मुख्य परीक्षा ओळखपत्र/प्रवेशपत्र

  • मुलाखत /व्यक्तीमत्व चाचणी परीक्षेस पात्र असल्याचा पुरावा

  • दहावी बोर्डचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला

  • आधार कार्ड, PAN कार्ड , पासबुक (राष्ट्रीयकृत बँक)

  • ४ पासपोर्ट साईज फोटो

  • हमीपत्र

लाभार्थी निवड प्रक्रिया :

  • सारथी पुणे संकेतस्थळावर Online application Form ची लिंक, मार्गदर्शक सूचना, जाहिरात, हमीपत्र, Model Code of Conduct प्रसिद्ध करण्यात येईल.

  • स्थानिक वृत्तपत्रातुन (DGIPR दराने) जाहिरात प्रसिध्द करून UPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण लक्षित गटातील उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतील.

  • अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकानंतर 10 दिवसाच्या आत कागदपत्रे पडताळणी करून पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. त्यानंतर 10 दिवसाच्या आत आर्थिक सहाय्य पात्र विद्यार्थ्यांना NEFT/RTGS द्वारे अदा करण्यात येईल.

लाभाचे स्वरूप :

  • UPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुलाखत / व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेच्या पुर्व तयारीसाठी विनाहजेरी एकवेळी एकरकमी रू.25,000/- आर्थिक सहाय्य लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांना NEFT/RTGS द्वारे अदा करण्यात येतात.

हमीपत्र :

  • लक्षित गटातील विद्यार्थ्याने सारथी पुणे मार्फत प्रायोजित विविध स्पर्धा परीक्षेच्या कोचिंग करिता उपलब्ध करून दिलेल्या उचित संधीचा लाभ घेणे अपेक्षित आहे व सारथी च्या नियमांचे व प्रशिक्षणा दरम्यान शिस्तीचे पालन करावे यासाठी हमीपत्र व मॉडेल कोड ऑफ कंडक्ट (Model Code of Conduct) विद्यार्थ्याकडून प्रवेश घेतेवेळी भरून घेतले जाते. विद्यार्थ्याने सदर प्रशिक्षण वर्षाच्या UPSC मुलाखत/व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेस बसणे आवश्यक अन्यथा संपूर्ण रक्कम वसूल करण्यात येईल.

खालील बाबी आढळल्यास अर्जदार प्रवेशासाठी अपात्र ठरेल.

  • सारथी च्या उपक्रमातील लाभार्थी निवड निकषनुसार(लक्षित गट/ शैक्षणिक अर्हता/वयोगट) अर्जदार अपात्र असल्यास

  • अपूर्ण कागदपत्रे/ विहित मुदतीत कागदपत्रे सादर न करणे.

  • अंतिम मुदतीनंतर अर्ज (ऑनलाईन/ऑफलाईन) करणे

  • अर्ज भरताना खोटी किंवा चुकीची माहिती भरणे.

  • इतर शासकीय/निमशासकीय/खाजगी, स्वायत्त संस्था याच्याकडून लाभ घेतलेला

  • असल्यास/घेत असल्यास उमेदवार अपात्र ठरतो. (No Dual Beneficiary)

  • सारथीच्या इतर उपक्रमाचा लाभ घेतलेला असल्यास/घेत असल्यास

  • सारथी संस्थेच्या नियमांचे उल्लंघन /शिस्तभंग केल्यास

प्रशिक्षण कालावधी व टप्पे, प्रवेश प्रक्रिया निकष, कोचिंग वर्ग निवड प्रक्रिया, आर्थिक सहाय्य (एकरकमी एकावेळा) चे स्वरूप व लाभाकरिता विद्यार्थी पात्रता निश्चित करण्याचा अंतिम अधिकार हा मा. व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे यांच्याकडे राहील.