Coaching for Union Public Service Commission Civil Services Competitive Examination (UPSC-CSE) Preparation

उपक्रमाचा उद्देश :

महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गातील लक्षित गटातील उमेदवारांना केंद्रीय नागरी सेवेतील प्रशासकीय पदावर काम करण्याची संधी मिळावी यासाठी सारथी पुणे संस्थेमार्फत UPSC (CSE) स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी लक्षित गटातील पात्र उमेदवारांना कोचिंग प्रायोजित करण्यात येते.

उपक्रमाचे स्वरूप :

ऑफलाईन

प्रशिक्षण ठिकाण :

पुणे व दिल्ली

लाभार्थी संख्या :

दर वर्षी UPSC (Civil Services) स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाकरिता CET व कागदपत्रे पडताळणी द्वारे एकूण 500 उमेदवारांची निवड करून पूर्व परीक्षा (Prelims), मुख्य परीक्षा (Mains) व मुलाखत/व्यक्तिमत्व चाचणी (Interview/Personality Test) या UPSC (CSE) परीक्षेच्या तीन टप्याकरिता कोचिंगचे नियोजन करण्यात येते.

लाभार्थी पात्रता :

  • अर्जदार हा महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या प्रवर्गातील असावा. (सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेला जातीचा दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे)

  • उमेदवाराच्या नावाचे सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले Non-creamy layer/ उत्पन्नाचे प्रमाणपत्र/ EWS प्रमाणपत्र आवश्यक आहे.

  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. आठ लाखापेक्षा जास्त नसावे.

  • उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील कायमचा रहिवासी असावा.

  • अर्जदार कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा तसेच अर्ज भरतेवेळी UPSC (Civil Services) परीक्षा देणे करिता पात्र असावा.

  • सारथी, पुणे मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही उपक्रमांचा या अगोदर लाभ घेतलेला नसावा/घेत नसावा.

  • इतर कोणत्याही शासकीय/निमशासकीय/खाजगी संस्थाकडून या प्रशिक्षणाकरिता लाभ घेतलेला नसावा/घेत नसावा.

वयोमर्यादा :

  • किमान 21 वर्ष व कमाल 32 वर्ष (मागास प्रवर्ग – 35 वर्ष)

आवश्यक कागदपत्रे :

  • जातीचा दाखला /शाळेचा दाखला

  • नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र/ उत्पन्नाचे प्रमाणपत्र (Income Certificate)/EWS प्रमाणपत्र

  • रहिवासी दाखला

  • पदवी प्रमाणपत्र

  • दहावी बोर्डचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला

  • आधार कार्ड, PAN कार्ड , पासबुक (राष्ट्रीयकृत बँक)

  • ४ पासपोर्ट साईज फोटो

  • हमीपत्र

  • मॉडेल कोड ऑफ कंडक्ट

प्रशिक्षण कालावधी /टप्पे :

टप्पा 1: पूर्व परीक्षा : अंदाजे 10 महिने (कमाल 10 महिने किंवा UPSC पूर्व परीक्षा घोषित दिनांक जो पहिला असेल तो.)

टप्पा 2: मुख्य परीक्षा : अंदाजे 4 महिने (कमाल 4 महिने किंवा UPSC मुख्य परीक्षेचा घोषित दिनांक जो पहिला असेल तो)

टप्पा 3: मुलाखत/व्यक्तिमत्व चाचणी : अंदाजे 1 1/2 महिने (कमाल 1 1/2 महिने किंवा UPSC मुलाखत/व्यक्तिमत्व चाचणी चा घोषित दिनांक जो पहिला असेल तो)

लाभार्थी निवड प्रक्रिया :

  • विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता लिंक, मार्गदर्शक सूचना, हमीपत्र, Model Code of Conduct व जाहिरात सारथी पुणे संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल व त्याची जाहिरात स्थानिक वृत्तपत्रातून देण्यात येईल.

  • अर्जदाराची निवड सारथी पुणे मार्फत आयोजित Common Entrance Test (CET) मधील प्राप्त गुणांवर आधारित करण्यात येईल. CET मध्ये गुणांकानुसार गुणवत्ता यादी सारथी पुणे संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

  • निकाल जाहीर झाल्यानंतर किमान 10 दिवसाच्या आत विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल. गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर यादीतील सर्व उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी सारथी, पुणे मुख्य कार्यालय येथे, घोषित केलेल्या दिवशी व वेळी, मूळ कागदपत्रे व आवश्यक इतर बाबी (फोटोच्या प्रती, बँक पासबुक ची छायांकित प्रत) घेऊन छाननी समिती समोर हजर राहणे बंधनकारक राहिल. सदर पडताळणीसाठी उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असल्यास तो प्रवेशास पात्र राहणार नाही.

  • कागदपत्रे पडताळणी द्वारे पात्र विद्यार्थ्यांची 10 दिवसाच्या आत प्रवेश प्रकिया पूर्ण करण्यात येईल.

  • प्रवेश निश्चित झाल्यानंतर विद्यार्थ्याने प्रवेश बाबत हमी देऊन कोचिंग मार्फत जाहीर रुजू दिनांक (Joining Date) रोजी रुजू होणे बंधनकारक राहील. उमेदवार कोणत्याही कारणास्तव विद्यार्थी रुजू दिनांक च्या पाच दिवसाच्या आत रुजू न झाल्यास, सदर विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द घोषित करण्यात येईल.

लाभाचे स्वरूप :

  • UPSC (Civil Services) स्पर्धा परीक्षेच्या कोचिंग करिता प्रवेश घेतलेल्या लाभार्थ्याचे कोचिंग शुल्क सारथी, पुणे मार्फत दिल्ली व पुणे येथील empanelled कोचिंग संस्थांना अदा करण्यात येईल.

  • पात्र उमेदवारास दिल्ली व पुणे येथील कोचिंग कालावधीतील पूर्व परीक्षेपर्यंत (Only upto Prelims) कोचिंग वर्गातील किमान 70% मासिक हजेरीच्या व किमान 35% टेस्ट स्कोर आधारे दिल्ली येथील वास्तव्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांना रु.13,000/- व महाराष्ट्र स्थानिक ठिकाणी /पुणे येथे वास्तव्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांना रू.9,000/- विद्यावेतन प्रति माह प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या खात्यावर NEFT/RTGS द्वारे अदा करण्यात येते.

  • UPSC (Civil Services) स्पर्धा परीक्षा लाभार्थ्यांना कोचिंग संस्थेत त्यांचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर आकस्मिक खर्च एकत्रित रक्कम रू.18,000/- सारथी, पुणे मार्फत विद्यार्थ्यांच्या खात्यावर NEFT/RTGS द्वारे अदा करण्यात येते. (संचालक मंडळ निश्चित करेल ती रक्कम अंतिम राहील)

  • UPSC पूर्वपरीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना UPSC मुख्य परीक्षेच्या तयारीकरिता सारथी पुणे मार्फत एकवेळ एकरकमी रू.50,000/- आर्थिक सहाय्य विनाहजेरी विद्यार्थ्यांच्या खात्यावर NEFT/RTGS द्वारे अदा करण्यात येते. (परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा आवश्यक)

  • UPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना UPSC मुलाखतीच्या तयारीकरिता सारथी पुणे मार्फत एकवेळ एकरकमी रू.25,000/- आर्थिक सहाय्य विद्यार्थ्यांच्या खात्यावर NEFT/RTGS द्वारे विनाहजेरी अदा करण्यात येईल.

कोचिंग संस्था निवड :

  • सारथी पुणे संस्थेच्या संकेतस्थळावर नामांकित कोचिंग संस्थाची निवड करण्यासाठी ईंडर प्रसिध्द करण्यात येते व त्याची जाहिरात स्थानिक व प्रसिध्द वृत्तपत्रात DGIPR दराने देऊन ई-टेंडर द्वारे नामांकित कोचिंग संस्थांची निवड केली जाईल.

  • ई-टेंडर द्वारे निवडलेल्या कोचिंग संस्थांना सारथी सोबत करारनामा करून Empanel करण्यात येते.

  • Empanelled संस्थापैकी विद्यार्थी स्वतःची आवड व गरजेप्रमाणे कोचिंग वर्ग निवड करतो.

हमीपत्र व मॉडेल कोड ऑफ कंडक्ट (Model Code of Conduct) :

  • लक्षित गटातील विद्यार्थ्याने सारथी पुणे मार्फत प्रायोजित विविध स्पर्धा परीक्षेच्या कोचिंग करिता उपलब्ध करून दिलेल्या उचित संधीचा लाभ घेणे अपेक्षित आहे व सारथी च्या नियमांचे व प्रशिक्षणा दरम्यान शिस्तीचे पालन करावे यासाठी हमीपत्र व मॉडेल कोड ऑफ कंडक्ट (Model Code of Conduct) विद्यार्थ्याकडून प्रवेश घेतेवेळी भरून घेतले जाते. उपक्रमात प्रवेश निश्चित झाल्यानंतर, पात्र विद्यार्थ्यांला प्रवेश पत्र दिले जाईल.

  • विद्यार्थ्याकडून प्रवेश घेतेवेळेस हमीपत्र भरून घेतले जाईल की, विद्यार्थी प्रवेश घेतल्यानंतर कोचिंगद्वारे घेण्यात येणाऱ्या सर्व चाचणी, ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता हजर राहील तसेच प्रशिक्षण पूर्ण करणार व कोणत्याही परिस्थितीत कोचिंग अर्धवट सोडणार नाही, कोचिंग अपूर्ण सोडल्यास सारथी पुणे संस्थेने केलेला सर्व खर्च वसूल केला जाईल.

खालील बाबी आढळल्यास अर्जदार प्रवेशासाठी अपात्र ठरेल.

  • सारथी च्या उपक्रमातील लाभार्थी निवड निकषनुसार(शैक्षणिक अर्हता/वयोगट/ अर्जदार अपात्र असल्यास

  • अपूर्ण कागदपत्रे/ विहित मुदतीत कागदपत्रे सादर न करणे.

  • अंतिम मुदतीनंतर अर्ज (ऑनलाईन/ऑफलाईन) करणे

  • अर्ज भरताना खोटी किंवा चुकीची माहिती भरणे.

  • इतर शासकीय/निमशासकीय/खाजगी, स्वायत्त संस्था याच्याकडून लाभ घेतलेला

  • असल्यास/घेत असल्यास उमेदवार अपात्र ठरतो. (No Dual Beneficiary)

  • सारथीच्या इतर उपक्रमाचा लाभ घेतलेला असल्यास/घेत असल्यास

  • सारथी संस्थेच्या नियमांचे उल्लंघन /शिस्तभंग केल्यास

प्रशिक्षण कालावधी व टप्पे, प्रवेश प्रक्रिया निकष, कोचिंग वर्ग निवड प्रक्रिया, आर्थिक सहाय्य (विद्यावेतन, आकस्मिक खर्च, कोचिंग शुल्क) चे स्वरूप व लाभाकरिता विद्यार्थी पात्रता निश्चित करण्याचा अंतिम अधिकार हा मा. व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे यांच्याकडे राहील.