Financial Assistance Initiative for UPSC Mains Exam Preparation :

उपक्रमाचा उद्देश :

सारथी पुणे मार्फत UPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण लक्षित गटातील उमेदवारांना UPSC मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी एकत्रित एकवेळ एकरकमी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.

लाभार्थी संख्या :

सारथी संस्थेमार्फत मागविण्यात आलेल्या जाहिरातीद्वारे लक्षित गटातील UPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण सर्व पात्र उमेदवारांना आर्थिक सहाय्य दिले जाते.

लाभार्थी पात्रता/निकष :

  • अर्जदार हा महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या प्रवर्गातील असावा. (सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेला जातीचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे)

  • उमेदवाराच्या नावाचे सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले Non-creamy layer/ उत्पन्नाचे प्रमाणपत्र/ EWS प्रमाणपत्र आवश्यक आहे.

  • उमेदवार महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.

  • उमेदवाराकडे UPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण असल्याचा व UPSC मुख्य परीक्षेस पात्र असल्याचा पुरावा असावा.

आवश्यक कागदपत्रे :

  • जातीचा दाखला /शाळेचा दाखला

  • नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र / उत्पन्नाचे प्रमाणपत्र (Income Certificate)/ EWS प्रमाणपत्र

  • रहिवासी दाखला

  • पदवी प्रमाणपत्र

  • पूर्व परीक्षा ओळखपत्र/प्रवेशपत्र

  • मुख्य परीक्षेस पात्र असल्याचा पुरावा

  • दहावी बोर्डचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला

  • आधार कार्ड, PAN कार्ड , पासबुक (राष्ट्रीयकृत बँक)

  • ४ पासपोर्ट साईज फोटो

  • हमीपत्र

लाभार्थी निवड प्रक्रिया :

  • सारथी पुणे संकेतस्थळावर Online application Link, मार्गदर्शक सूचना, जाहिरात, हमीपत्र, Model Code of Conduct प्रसिद्ध करण्यात येईल.

  • स्थानिक वृत्तपत्रातुन (DGIPR दराने) जाहिरात प्रसिध्द करून UPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण लक्षित गटातील उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतील.

  • अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकानंतर 10 दिवसाच्या आत कागदपत्र पडताळणी करून पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. त्यानंतर 10 दिवसाच्या आत आर्थिक सहाय्य लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांना NEFT/RTGS द्वारे अदा करण्यात येईल.

लाभाचे स्वरूप :

  • UPSC पूर्वपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारी साठी विनाहजेरी एकवेळी एकरकमी रू.50,000/- आर्थिक सहाय्य लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांना NEFT/RTGS द्वारे अदा करण्यात येतात.

हमीपत्र :

  • लक्षित गटातील विद्यार्थ्याने सारथी पुणे मार्फत प्रायोजित विविध स्पर्धा परीक्षेच्या कोचिंग करिता उपलब्ध करून दिलेल्या उचित संधीचा लाभ घेणे अपेक्षित आहे व सारथी च्या नियमांचे व प्रशिक्षणा दरम्यान शिस्तीचे पालन करावे यासाठी हमीपत्र व मॉडेल कोड ऑफ कंडक्ट (Model Code of Conduct) विद्यार्थ्याकडून प्रवेश घेतेवेळी भरून घेतले जाते. विद्यार्थ्याने सदर प्रशिक्षण वर्षाच्या UPSC मुख्य परीक्षेस बसणे आवश्यक अन्यथा संपूर्ण रक्कम वसूल करण्यात येईल.

खालील बाबी आढळल्यास अर्जदार प्रवेशासाठी अपात्र ठरेल.

  • सारथी च्या उपक्रमातील लाभार्थी निवड निकषनुसार(लक्षित गट/ शैक्षणिक अर्हता/वयोगट) अर्जदार अपात्र असल्यास

  • अपूर्ण कागदपत्रे/ विहित मुदतीत कागदपत्रे सादर न करणे.

  • अंतिम मुदतीनंतर अर्ज (ऑनलाईन/ऑफलाईन) करणे

  • अर्ज भरताना खोटी किंवा चुकीची माहिती भरणे.

  • इतर शासकीय/निमशासकीय/खाजगी, स्वायत्त संस्था याच्याकडून लाभ घेतलेला असल्यास/घेत असल्यास उमेदवार अपात्र ठरतो. (No Dual Beneficiary)

  • सारथीच्या इतर उपक्रमाचा लाभ घेतलेला असल्यास/घेत असल्यास

  • सारथी संस्थेच्या नियमांचे उल्लंघन /शिस्तभंग केल्यास

प्रशिक्षण कालावधी व टप्पे, प्रवेश प्रक्रिया निकष, कोचिंग वर्ग निवड प्रक्रिया, आर्थिक सहाय्य (एकरकमी एकावेळा) चे स्वरूप व लाभाकरिता विद्यार्थी पात्रता निश्चित करण्याचा अंतिम अधिकार हा मा. व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे यांच्याकडे राहील.