Sarthi Department of Education

दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षीत गटातील इ.9 वी ते इ. 12 वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना लागू करणेबाबत

संदर्भ -

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक :सीबीसी-10/2017/ प्र.क्र.02/ मावक, दिनांक 26 सप्टेंबर,2018 अन्वये

उद्दिष्ट्ये-

  • लक्षित समाजातील इ. ९ वी ते इ. 12 वी मधील आर्थिक दुर्बल असणाऱ्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टिने त्यांना * आर्थिक सहाय्य करणे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरा पर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत होणार आहे
  • मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटातील समाजातील आर्थिक दृष्टया मागास विद्यार्थ्यांची शाळेतून होणारी गळती थांबविणे.
  • मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटातील समाजातील आर्थिक दृष्टया मागास पालकांना त्यांच्या पाल्यास शाळेत पाठविण्यासाठी उत्तेजन देणे.
  • मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटातील समाजातील आर्थिक दृष्टया मागास विद्यार्थ्यांच्या पालकांचा त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणावर होणा-या खर्च व आर्थिक भार कमी करणे.
  • शिक्षणाद्वारे मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण करणे.
  • मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजाची शैक्षणिक उन्नती होण्यास मदत करणे.

पात्रता :

  • राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील एकूण पात्रता धारण केलेल्या परंतु शिष्यवृत्तीसाठी निवड न होवू शकलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येईल.
  • पालकांचे (आई व वडील दोघे मिळून) वार्षिक उत्पन्न रू 1,50,000 पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थपना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदार/तलाठी यांचा मागील आर्थिक वर्षांचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्यध्यापकांकडे देणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थी/विद्यार्थिनी इ. 7 वी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.

परीक्षेचे स्वरूप :

केंद्रशासनामार्फत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी सन 2007-08 पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इ. 8 वी साठी सुरु केलेली आहे. सदर परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेमार्फत दरवर्षी घेण्यात येते.

  • परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
  • परीक्षा उत्तरपत्रिका तपासणी संगणकामार्फत OMR पध्दतीने तपासली जाते.
  • प्रश्नपत्रिका इ. 7 वी व 8 वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असते.
  • परीक्षा आठ माध्यमात देण्याची सोय आहे.
  • परीक्षा एकूण १८० गुणांची असते .
  • बौद्धिक क्षमता चाचणी (MAT) व शालेय क्षमता चाचणी (SAT) असे दीड –दीड तासांचे दोन पेपर असतात.
  • परीक्षेत उत्तीर्ण होण्यासठी एकत्रित ४०% गुण आवश्यक आहेत.
  • शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी ९ वी व ११ वी मध्ये किमान ५५% गुण मिळणे आवश्यक आहे.
  • इयत्ता १० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहे.

लाभाचे स्वरूप :

  • NMMS परीक्षेतून राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी वगळता उर्वरीत पास झालेले लक्षित गटातील विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी ते इ. 12 वी पर्यंत वार्षिक 10,000/- पर्यंत शिष्यवृत्ती देणे प्रस्तावित आहे.

लाभार्थी संख्या :

  • या योजनेसाठी जवळपास 10,000 लाभार्थी निवडले जातील असे प्रस्तावित आहे.

अपेक्षित वार्षिक खर्च :

  • प्रथम वर्षी शिष्यवृत्तीपोटी 10 कोटी व प्रसिद्धी, इतर खर्चापोटी 10 लक्ष. विद्यार्थ्यांना 9 ते 12 पर्यंत शिष्यवृत्ती देणे असल्याने प्रतिवर्षी याच प्रमाणात खर्चवाढ अपेक्षीत आहे.