Research Department

पार्श्वभूमी

  • सारथीच्या प्रमुख उद्देशांपैकी एक “To award fellowships for higher studies including M.Phil., Ph.D. and Post-Doctoral studies to the candidates of the Target Groups.” मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजामधून उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मेहनती व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीच्या माध्यमाने विशेष प्रोत्साहन देणे हा या अभिनव उपक्रमामागे उद्दिष्ट आहे. संशोधन या क्रियेची व्याप्ती अत्यंत विशाल आहे. तथापि, सारथी संस्थेतील संशोधन विभागाकडून अपेक्षित असणाऱ्या संशोधनाची व्याप्ती सारथीच्या उद्दिष्टांनुसार सीमित व निश्चित करण्यात आली आहे. सारथी संस्था हि मुख्यत्वे लक्षित घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचा अभ्यास करून विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व उपायायोजना सुचविणेसाठी निर्माण करण्यात आलेली असल्यामुळे, ‘सारथी’ मधील संशोधनाचा उपयोग हा अशा समस्या सोडवण्यासाठी केला जाणार आहे. त्या व्यतिरिक्तही लक्षित घटकांमधून पात्र उमेदवारांना विविध प्रकारचे संशोधनासाठी ‘सारथी’ मार्फत मदत करण्यात येत आहे. संशोधन विभागामार्फत प्रामुख्याने खालील प्रमाणे उपक्रम राबविण्यात येत आहे.

  • ‘सारथी’ कडून लक्षित गटाच्या पात्र उमेदवारांना एम.फिल (M.Phil.),पीएच.डी. (Ph.D.) साठी विविध अधिछात्रवृत्ती :- महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, महात्मा जोतीराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. पंजाबराव देशमुख, गुरुवर्य बाबुराव गणपतराव जगताप, संत गाडगेबाबा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, अहिल्यादेवी होळकर आणि बहिणाबाई चौधरी यांनी आयुष्यभर केलेले संघर्ष, दिलेले तत्त्वज्ञान सर्वांना प्रेरणादायी आहे. त्यांच्या जीवनाचा आदर्श व त्यांनी दिलेले तत्वज्ञानामुळे संपूर्ण समाज उपकृत आहे. त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब भारताच्या संविधानाच्या मुलभूत तत्वांमध्ये दिसते. त्यांना आदरांजली म्हणून त्यांच्या स्मरणार्थ “सारथी” ने त्यांच्या नावाने मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजाच्या पात्र उमेदवारांसाठी अधिछात्रवृत्ती प्रकल्प सुरु केले. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजामधून उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मेहनती व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीच्या माध्यमाने विशेष प्रोत्साहन देणे हा या अभिनव उपक्रमामागे उद्दिष्ट आहे. सदर लक्षित गटाच्या पात्र उमेदवारांपैकी संशोधनामध्ये आवड असलेल्या उमेदवारांना एम.फिल./पीएच.डी. साठी हि अधिछात्रवृत्ती सुरु केली. अधिछात्रवृत्ती करिता पात्रता, आरक्षण आणि आर्थिक सहाय्य खालीलप्रमाणे:-

पात्रता

  • उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. (सक्षम प्राधिकरणाद्वारे जारी केलेले रहिवाशी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.)
  • उमेदवार हा मराठा / कुणबी / मराठा-कुणबी / कुणबी-मराठा या लक्षित गटातील जातीचा असणे आवश्यक आहे. (सक्षम प्राधिकरणाद्वारे जारी केलेले जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे)
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे सर्व स्रोतांकडून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 8 लाख पेक्षा जास्त नसावे (केवळ नॉन-क्रीमिलेयर उमेदवारांसाठी) (संदर्भ: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन निर्णयक्र. सीबीसी -10 / 2008 / प्र. क्र.६९७/ विभाजक -१, दिनांक 16 डिसेंबर, २०१७ (सक्षम प्राधिकरणाद्वारे जारी केलेल नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे)
  • अर्ज भरण्याच्या दिवशी उमेदवाराकडे कोणत्याही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एम.फील. (M.Phil.) किंवा पीएच.डी. (Ph.D.) करिता आवश्यक नोंदणी पुष्टीकरण पत्र आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

आरक्षण:

  • ५०% आरक्षण हे लक्षित गटातील महिला उमेदवारांसाठी राखीव.
  • ३% आरक्षण हे लक्षित गटातील दिव्यांगजनासाठी राखीव.

सारथीच्या मार्गदर्शक तत्वानुसार उपरोक्त अधिछात्रवृत्ती अंतर्गत आर्थिक सहाय्य:-

Fellowship in Humanities, Social Sciences, Sciences, Engineering & Technology M. Phil. @ Rs. 31000/- p.m. for 2 years (CSMNJRF)
Ph.D. @ Rs. 31000/-p.m. for 1st & 2nd year (CSMNJRF)
@ Rs. 35000/- p. m. for 3rd, 4th& 5th year subject to providing upgradation certificate (CSMNSRF)
Contingency A @ Rs. 12000/- p.a. for initial 1st & 2nd year Humanities & Social Sciences
@ Rs. 25000/- p.a. for 3rd, 4th, & 5th year
Contingency B @ Rs. 10000/- p.a. for initial 1st & 2nd year Sciences, Engg. & Technology
@ Rs. 20500/- p.a. for 3rd, 4th, & 5th year
Escorts / Reader assistance @ Rs. 2000/- p.m. in case of Persons with Disability (दिव्यांगजन) candidates For all disciplines
HRA As per Govt. norms For all disciplines

उपरोक्त अधिछात्रवृत्तीकरिता विविध वर्तमानपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात जाहिरात प्रसिद्ध करून अधिछात्रवृत्ती करिता अर्ज मागविण्यात येते . जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार उमेदवार हा एकापेक्षा जास्त अधिछात्रवृत्ती करिता अर्ज करू शकत होता. तथापि त्यामुळे एका उमेदवारास कोणती अधिछात्रवृत्ती भेटणार यामुळे संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे १३ प्रकारच्या अधिछात्रवृत्ती एकत्रित करून “छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF-२०१९)” च्या नावाने सर्व उमेदवारांची एकाच वेळी मुलाखत प्रक्रिया राबविण्यात आली. मुलाखतीकरिता विषयानुसार महाराष्ट्रातील विविध नामांकित विद्यापीठातील विषयनिहाय तज्ञ व्यक्तींची निवड समिती गठीत करण्यात आली होती. त्यानुसार दिनांक २२ ऑगस्ट व २९ ऑगस्ट, २०१९ रोजी मुलाखत प्रक्रिया पार पाडण्यात आली.

“छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF-२०१९)”

  • मुलाखत प्रक्रिया पार पाडल्यानंतर दिनांक ०५ सप्टेंबर, २०१९ रोजी “छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF-२०१९)” अधिछात्रवृत्ती करिता तात्पुरती निवड झालेल्या (Provisional Selection List) एकूण ३७७ उमेदवारांची यादी सारथी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली.
  • उपरोक्त निवड झालेल्या उमेदवारांना मूळ कागदपत्रे पडताळणी तथा अवार्ड लेटर प्रदान करण्यासाठी दिनांक ८ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर, २०१९ या कालावधीत बोलविण्यात आले.
  • मूळ कागदपत्रे पडताळणी केल्यानंतर एकूण ३५७ उमेदवारांची यादी सारथी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. सदरील उमेदवारांना हमीपत्र (Undertaking) तथा रुजू अहवाल (Joining Report) सारथी कार्यालयात वेळेत जमा करण्यास कळविण्यात आले.
  • सद्या उमेदवारांचे सर्व आवश्यक कागदपत्र उपलब्ध झाले असून त्यांना दिनांक ११ सप्टेंबर, २०१९ ते ३० नोव्हेंबर, २०१९ पर्यंतची अधिछात्रवृत्तीची एकूण - रक्कम रु. ४६,८५,१५२/- (अक्षरी- सेहेचाळीस लक्ष पंच्याऐंशी हजार एकशे बावन रुपये) अदा करण्यात आली आहे.
  • तसेच वेळोवेळी अधिछात्रवृत्तीधारकांकडून प्राप्त होणाऱ्या कागदपत्राचे पडताळणी करून त्यांना अधिछात्रवृत्तीची रक्कम अदा करण्यात येईल.

मुख्यमंत्री विशेष संशोधन अधिछात्रवृत्ती (CMSRF-२०१९)

अनेक विद्यार्थी संशोधक जे दिनांक ०१ जून, २०१८ पूर्वीचे नोंदणीकृत होते, त्यांनी सारथी कार्यालयास भेट देवून त्यांच्यासाठी पण अधिछात्रवृत्ती सुरु करण्यात यावी असे निवेदन दिले. त्यानुसार सारथी मार्फत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी प्रवर्गातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मेहनती आणि गुणवत्ताधारक एम.फिल व पीएच.डी साठी दिनांक ०१ जून, २०१८ पूर्वी नोंदणी झालेल्या उमेदवारांसाठी संधी उपलब्ध करून देण्याकरिता “मुख्यमंत्री विशेष संशोधन अधिछात्रवृत्ती – २०१९” सुरु करण्यात आली. सदर अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज मागविण्याकरिता विविध वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देण्यात आली.

उपरोक्त अधिछात्रवृत्ती करिता एम.फिल. / पीएच.डी साठी दिनांक ०१ जून, २०१८ पूर्वी नोंदणी झालेले उमेदवार अर्ज करू शकत होते. या व्यतिरिक्त इतर सर्व पात्रता, आरक्षण आणि आर्थिक सहाय्य उपरोक्तप्रमाणे नमूद केल्यानुसार लागू होते.

  • अधिछात्रवृत्ती करिता विषयनिहाय तज्ञ व्यक्तींची निवड समिती मार्फत मुलाखत प्रक्रिया पार पाडल्यानंतर दिनांक १३ सप्टेंबर, २०१९ रोजी मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात आली. मूळ कागदपत्रे पडताळणी केल्यानंतर “मुख्यमंत्री विशेष संशोधन अधिछात्रवृत्ती (CMSRF-२०१९)” अंतर्गत एकूण १४६ उमेदवारांची यादी सारथी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. सदरील उमेदवारांना हमीपत्र (Undertaking) तथा रुजू अहवाल (Joining Report) सारथी कार्यालयात वेळेत जमा करण्यास कळविण्यात आले.
  • सद्या उमेदवारांचे सर्व आवश्यक कागदपत्र उपलब्ध झाले असून त्यांना दिनांक ११ सप्टेंबर, २०१९ ते ३० नोव्हेंबर, २०१९ पर्यंतची अधिछात्रवृत्तीची एकूण - रक्कम रु. ३२,७९,८१२/- (अक्षरी- बत्तीस लक्ष एकोणऐंशी हजार आठशे बारा रुपये) अदा करण्यात आली आहे.
  • तसेच वेळोवेळी अधिछात्रवृत्तीधारकांकडून प्राप्त होणाऱ्या कागदपत्राचे पडताळणी करून त्यांना अधिछात्रवृत्तीची रक्कम अदा करण्यात येईल.

छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृती (CSMNRF-२०२०)

सारथी मार्फत प्रदान करण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती CSMNRF-२०१९ ला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे त्याच धर्तीवर पुढील कालावधीमध्ये म्हणजे वर्ष २०२० साठी लक्षित गटातील एम.फिल. व पीएच.डी. साठी नोंदणी झालेल्या विद्यार्थीसाठी “छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती” (CSMNRF-२०२०) या एकाच नावाने अधिछात्रवृत्ती सुरु करण्यात आली.

CSMNRF-2020 साठी 342 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यातील 241 पात्र विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आले. दि. 01/06/2021 रोजीच्या मा. संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर केल्या नुसार मुलाखतीस उपस्थित सर्व पात्र विद्यार्थ्यांना घेण्यात यावे तसेच अनुपस्थित विद्यार्थ्यांना पुन्हा:एक संधी मुलाखती करिता देण्यात यावी यानुसार 207 विद्यार्थ्यांना पात्र करण्यात आले आहे. अनुपस्थित 34 विद्यार्थ्यां पैकी दि 3 व 4 ऑगस्ट, 2021 रोजी घेण्यात आलेल्या मुलाखती द्वारे एकूण 10 विद्यार्थ्यांना पात्र करण्यात आले आहे.

सन 2021 च्या M.Phil/Ph.D.‍ विद्यार्थ्यांची Fellowship साठी निवड प्रक्रिया सुरु:

CSMNRF-2021 निवड प्रक्रियेच्या अनुषंगाने दि. 15/07/2021 रोजी विद्यार्थ्यांचे सारिथी संकेतस्थळा वरुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते सदर ऑनलाईन अर्जाची अर्ज करण्याची अंतीम दि. 31/08/2021 होती तसेच, ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी पोस्टा द्वारे पाठविण्याची अंतीम दि. 10/9/2021 होती. सदर ऑनलाईन भरलेले संकेतस्थळावरील प्राप्त अर्जाची संख्या ही 755 आहे.

CSMNRF-2021 करिता मुलाखत व कागदपत्र पडताळणी प्रक्रिया नोव्हेंबर/ डिसेंबर 2021 अखेर पूर्ण करण्यात येणार आहे.

सन 2022 Fellowship साठी जानेवारी 2022 मध्ये जाहिरात देण्यात येणार आहे.