Department of Statistics and Assessment

  • छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), कंपनीच्या मेमोरेंडम ऑफ असोसिएशन (MOA) आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन मध्ये नमूद मुख्य 3 उद्दिष्टे व 82 उप-उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संस्थेच्या लक्षित गटातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने सारथी संस्थेचा “भविष्यकालीन योजनांचा आराखडा (Vision Document) 2030” तयार करण्यात येत आहे. सदर आराखडा हा उद्दिष्ट अनुरुप पुढील पाच वर्षात, दहा वर्षात व पंचवीस वर्षात संस्थेकडून कोणत्या योजना राबविण्यात याव्यात, याबाबतची मार्गक्रमणाची दिशा निश्चित करण्यासाठी राज्यातील, देशातील विविध क्षेत्रात काम करीत असलेल्या सामाजिक संस्था, विविध क्षेत्रामध्ये कार्यरत तज्ञ व नागरिकांकडून संस्थेस प्राप्त झालेल्या सूचनांचा सांगोपांग विचार करून आर्दश “भविष्यकालीन योजनांचा आराखडा (Vision Document) 2030” तयार करणे.

  • सारथी संस्थेद्वारे लक्षित गटाचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास साध्य करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांची फलनिष्पती बाबत वेळोवेळी सांख्यिकीय अभ्यास पाहणी व सर्वेक्षण हाती घेणे.

  • सारथी संस्थेच्या माध्यमातून जी काही विविध विषयांची सांख्यिकीय अभ्यास पाहणी व सर्वेक्षण पाहणी घेण्यात येतील यासाठी सांख्यिकी अधिनियम २००८ च्या अनुषंगाने सारथी संस्थेमार्फत आर्दश मार्गदर्शन तत्वे व आवश्यक नियमावली तयार करणे.

  • सारथी संस्थेचे स्व:ताचे “Centre of Excellence” तयार करण्यासाठी नियोजन करणे. यासाठी इतर सामाजिक सर्वेक्षण करणाऱ्या नामांकित संस्थांच्या सर्वेक्षणा बाबतच्या नियमावली व मार्गदर्शक तत्वे यांचा अभ्यास करुन परिपूर्ण “Centre of Excellence” तयार करणे.

  • विविध सांख्यिकीय काम करणाऱ्या शासकीय, निमशासकीस व खाजगी संस्थांच्या मदतीने सारथी संस्थेस आवश्यक “ सांख्यिकीय माहिती कोष ” तयार करणे.

  • सारथी संस्थेच्या लक्षित गटाची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगती दर्शवणारे निर्देशांक/ सूचकांक तयार करणे व सदर निर्देशांक वेळोवेळी अद्ययावत करण्यासाठी सर्वेक्षण व संशोधन प्रकल्प हाती घेणे.

  • सारथी संकेत स्थळावर तसेच संस्थेच्या इतर महत्तवाच्या अहवालामध्ये संस्थेची प्रगती व स्थिती दर्शविणारी सांख्यिकीय माहिती व आलेख तयार करणे.