ग्रंथालय विषयी
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून कंपनी कायदा, 2013 च्या कलम 8 अंतर्गत नोंदणी करण्याकरीता शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार संस्थेची दिनांक 25 जून 2018 रोजी स्थापना करण्यात आली आहे. दिनांक 11/2/2019 पासून सारथी संस्था कार्यान्वित करण्यात आली. सध्या ग्रंथालयात सामाजिक शास्त्र या विषयांतर्गत विविध थोर समाजसुधारकांच्या विचारांची तसेच प्रशासन, अध्यात्मिक, व्यक्तिमत्त्व विकास, अंधश्रद्धा, एैतिहासिक, ग्रामीण विकास, संशोधनात्मक, महिलांविषयक, आरोग्य, संदर्भ ग्रंथ-शब्दकोश, मराठी विश्वकोश, जिल्हा गॅझेटिअर, कृषीशास्त्र, चरित्र-आत्मचरित्र, लेखसंग्रह अशा विविध विषयांवर नामवंत लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांचा समावेश आहे. सध्या ग्रंथालयात मराठी व इंग्रजी भाषेतील मिळून सुमारे 3 हजार पुस्तके आहेत. संस्थेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ती पुस्तके उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली आहे. सारथी संस्थेच्या ग्रंथालयात मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाकरिता समाजोपयोगी व प्रेरणादायी पुस्तकांचा समावेश केला जातो.