सुभेदार तानाजी मालुसरे ऐतिहासिक दस्ताऐवज जतन योजना

 मा. श्री. अशोक काकडे, भा.प्र.से.
मा. श्री. अशोक काकडे, भा.प्र.से.
व्यवस्थापकीय संचालक, सारथी

शुभेच्छा संदेश

प्रिय इतिहास प्रेमी आणि संशोधक मित्रांनो

छत्रपती शाहू महाराजांचा सामाजिक सुधारणांचा कालखंड हा महाराष्ट्रात साठी नाही तर संपूर्ण देशासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहावा इतका दौदिप्यमान आहे, तसेच उत्तम प्रशासनाचा मार्ग दाखविणारा आहे.

छत्रपती शाहू महाराज यांनी शेतकरी, कष्टकरी, भूमिहीन व वंचित घटकासाठी अनेक पुरोगामी शैक्षणिक व सामाजिक तसेच कला, उद्योग, कृषी,

क्रिडा, जलसंधारण यासारख्या अनेक योजना राबवून जनतेच्या दैनंदिन आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले. या त्यांच्या कार्यामुळे

कोल्हापूर संस्थान देशातील अग्रगण्य संस्थान म्हणून नावारूपास आले. त्यांनी या सुधारणा स्वतःच्या संस्थानापुरत्याच मर्यादित न ठेवता कोल्हापूर

संस्थांना बाहेरील अनेक शैक्षणिक संस्थांनाही सढळ हाताने मदत केली. हे परिवर्तन करण्यासाठी शाहू महाराजांनी घेतलेले विविध निर्णय केलेल्या विविध योजना इत्यादी बाबतची कागदपत्रे शासकीय आदेश, शाहू दफ्तर रुमाल, ठराव पुस्तके हा दस्तऐवज संशोधकांसाठी व जिज्ञासू जनतेसमोर आणण्यासाठी सारथी संस्थेच्या माध्यमातून 'सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे ऐतिहासिक दस्तऐवज जतन योजना' राबवत आहोत.

या अनमोल दस्तऐवजातीव काही भाग हा सारथीच्या वेबसाईटवर पहिल्यांदाच इतिहास सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. ज्या पुरातत्व विभागामुळे सदर अप्राशित साहीत्य सारथी प्रकाशन करू शकली त्या पुरातत्व विभागाचे विशेष आभार, ज्यांच्या सहकार्यामुळे हे संभवले. आपण सर्वांना या योजनेचा लाभ घेण्याची ही सुवर्ण संधी आहे. ही योजना सामान्य जनतेसह इतिहास तज्ञ, PhD संशोधक विद्यार्थी यांना आपल्या इतिहासाची समृद्ध वारसा गहनतेने समजून घेण्याची संधी देते. या सर्व साहित्याचे यथावकाश ग्रंथ स्वरूपात प्रकाशन केले जाईल.

आमच्या संस्थेचे बोधवाक्य 'शाहू विचारांना देवूया गती, साधूया सर्वांगीन प्रगती' या उपक्रमाच्या माध्यमातून साकारत आहे. मी आपल्या सर्वांना या उपक्रमामुळे निर्माण झालेल्या संधीचा लाभ घेण्यासाठी व आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी योगदान देण्यासाठी आवाहन करतो. आपण सर्व एकत्र येऊन आपल्या ऐतिहासिक वारसाचे पुनः जागर करू व नव्या पिढ्यांसाठी ते संवर्धित करूया.

धन्यवाद !

मा. श्री. अजित निंबाळकर, भा.प्र.से.(से.जि.)
मा. श्री. अजित निंबाळकर, भा.प्र.से.(से.जि.)
अध्यक्ष, सारथी

शुभेच्छा संदेश

प्रिय इतिहास प्रेमी आणि संशोधक मित्रांनो

आपल्या महाराष्ट्राच्या अभिमानास्पद इतिहासाचे एक गौरवशाली पान, शूर सरनौबत नरवीर तानाजी मालुसरे यांची वीरगाथा आपल्या सर्वांना अवगत असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वस्त साथीदार, ज्यांनी अदम्य साहस व दृढ निश्चयी भावनेने स्वराज्य स्थापनेच्या लढाईत अजोड योगदान दिले. या महान योद्ध्याच्या स्मृती व त्यांच्या कार्यास अभिवादन करण्याच्या उद्देशाने, सारथी संस्था 'सरनौबत नरवीर तानाजी मालुसरे ऐतिहासिक दस्तऐवज जतन योजना' राबवत आहे. या योजनेतून, छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील सामाजिक व शैक्षणिक सुधारणांचे दस्तऐवज, राजकीय पत्रव्यवहार, शासकीय आदेश, तसेच शाहू दप्तर रूमाल व ठरावपुस्तके आता सारथीच्या वेबसाईटवर सर्वसामान्यांसाठी प्रसिद्ध केले गेले आहेत.

मी पुरातत्व विभागाच्या अमूल्य सहकार्याचे मनःपूर्वक आभार मानतो. या विभागाच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि त्यांच्या

तज्ञांच्या अथक कार्यामुळे आपल्या ऐतिहासिक वारसाचे जतन आणि संवर्धन सुनिश्चित होत आहे. त्यांच्या सहकार्याने आपल्या संस्कृती आणि इतिहासाच्या अनमोल खजिन्याचे जतन आणि विस्तार साधण्यास मदत होत आहे, ज्याचा फायदा आपल्या पिढ्यांना होईल. आपण सर्वांनी या अमूल्य दस्तऐवजांचा लाभ घेतला पाहिजे. यामुळे आपण आपल्या महान वारसाला अधिक खोलवर समजून

घेण्यासाठी सक्षम होऊ शकाल. या सर्व दस्तऐवजांचे पुढे ग्रंथरूपात प्रकाशन देखील केले जाईल. चला, आपण सर्व एकत्र येऊन आपल्या ऐतिहासिक वारसाचे पुनर्जागरण करून नव्या पिढ्यांसाठी ते संवर्धित करूया.

धन्यवाद !

ऐतिहासिक दस्तऐवज

अ.क्र दस्तऐवजाचे नाव पहा
1 राजर्षी छत्रपती शाहू महाराजकालीन ठराव पुस्तके View
2 प्रशासकीय अहवाल View
3 शाहूदप्तर अहवाल View