महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी परदेशातील उच्च शिक्षणासाठी गुणवंत मुला-मुलीना शिष्यवृत्ती

उपक्रमाचा उद्देश:

महाराष्ट्रातील गुणवंत मुला-मुलीना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.

उपक्रमाचे स्वरूप:

सारथी मार्फत द्यावयाची शिष्यवृत्ती ही खर्चाची प्रतिपुर्ती योजना आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी आपापल्या विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर शिक्षण शुल्क, विमान प्रवास भाडे, आरोग्य विमा रक्कम व निर्वाह भत्ता त्यांनी या कार्यालयास खर्चाच्या पावत्या पाठवल्यानंतर प्रतिपुर्ती केली जाते.

प्रशिक्षण ठिकाण:

परदेशातील QS world ranking मध्ये 200 च्या आत रँकींग असलेल्या शैक्षणिक संस्था/ विद्यापीठ.

लाभार्थी संख्या:

(२०२३-२४)-५० / (२०२४-२५)- ७५

लाभार्थी पात्रता:

  • लाभार्थी हा मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व भारतीय असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्याला परदेशातील QS World Ranking मध्ये २०० च्या आत ranking असलेल्या शैक्षणिक संस्था/ विद्यापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश मिळालेला असावा.
  • विद्यार्थ्याने पदयुत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पीएचडीसाठी यापूर्वी इतर कोणत्याही राज्य शासनाची अथवा केंद्र शासनाची परदेशी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी. तसेच त्याने अन्य प्रशासकीय विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीच्या योजनेसाठी अर्ज केलेला नसावा.
  • परदेशातील विद्यापीठ/ शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा केवळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा.
  • पदयुत्तर अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्यांची वयाची कमाल ३५ वर्ष आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्यांची वयाची कमाल ४० वर्ष वयोमर्यादा असावी.

शैक्षणिक अहर्ता:

  • परदेशातील पदयुत्तर पदवी किंवा पदयुव्त्त्तर पदविका अभ्यासक्रमासाठी (PG) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठामधून किमान ५५% गुणासहित पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने (Ph.D) भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठामधून किमान ५५% गुणासहित पदयुव्त्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • हा पदवी किंवा पदयुत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने अर्जाच्या दिनांकाला उत्तीर्ण केलेला असावा.

आवश्यक कागदपत्रे:

  • Caste certificate (Maratha, Kunbi, Maratha-Kunbi, Kunbi-Maratha
  • Income certificate (Family income should be less than 8 lacks)
  • Unconditional offer letter/ admission confirmation letter from university
  • Graduation Marksheet and certificate showing the CGPA or Percentage of marks.

सूचना- तपशिलावर कागदपत्रे काय असावे याकरिता नोटीस बोर्डवरील शासन निर्णय वाचावा. (नियोजन विभाग, शासन निर्णय क्रमांक : सारथी २०२२/प्र.क्र.२८९/का.१४२५-अ, दिनांक : २० जुलै, २०२३)

प्रशिक्षण कालावधी / टप्पे:

PG - 2 Year / Ph.D - 4 Year

लाभार्थी निवड प्रक्रिया’:

सारथी संस्थेद्वारे अर्ज मागवून पडताळणी होऊन मंत्रालयातून शासन निर्णय निर्गमित होतो.

लाभाचे स्वरूप:

PG- Per year 30 Lakh / Ph.D- Per year 40 Lakh

अर्जदार प्रवेशासाठी अपात्र कोणत्या बाबी पूर्तता न झाल्यास ठरेल:

Income above 8 lakh Caste certificate ( Not in Target Group) Unconditional offer letter/ admission confirmation letter, if not received. University not in 200 QS Ranking

योजना सारथीच्या कोणत्या विभागीय कार्यालयामार्फत राबवली जाते( कार्यालयाचे नाव):

सारथी, मुख्य कार्यालय, पुणे