वापरसुलभता

वापरसुलभता

कोणत्याही उपकरणांचा किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून, सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांना महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ पाहता आणि वापरता यावे, यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या सर्व व्यक्तींना संपूर्ण मजकूर पाहता यावा आणि त्यापासून शक्य ते लाभ घेता यावेत, या उद्देशाने हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे वेब सक्रीय मोबाईल, डब्ल्यू ए पी फोन, पीडीए आणि इतर विविध प्रकारच्या उपकरणांमध्ये हे संकेतस्थळ पाहता येईल.

दिव्यांग व्यक्तींनाही या पोर्टलवरील माहितीचा लाभ घेता यावा, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. उदा. स्क्रीन रीडर आणि भिंग अशा सहाय्यक पर्यायांचा वापर करून दृष्टीहीन व्यक्तींनाही या पोर्टलवरील माहितीचा लाभ घेता येईल.

या पोर्टलला भेट देणाऱ्यांना सोईस्कर वाटेल, अशा प्रकारे या पोर्टलचे विकसन करत असतानाच मानकांचे पालन करणे तसेच वापर सुलभता आणि रचनेसंबंधीच्या सर्वसामान्य तत्त्वांचे पालन करणे, हे सुद्धा आमचे ध्येय आहे. या पोर्टलच्या वापर-सुलभतेसंदर्भात तुमच्या काही सूचना असतील किंवा काही समस्या असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.

सुगमता वैशिष्ट्येः

मुख्य विषयाकडे जाण्यासाठीः कळफलकाचा वापर करून परत परत पानांमध्ये न जाता पानाच्या मुख्य गाभ्यामध्ये जलद प्रवेश होण्याची तरतूद. मुख्य पानावर जाण्यासाठीः मुख्य पानाच्या पटलावर जलद प्रवेश होण्याची तरतूद ज्याद्वारे विविध उपविभाग जसे की नागरिक, शासन आणि निर्देशिका यामध्ये प्रवेश करणे शक्य होते.

सुगमता पर्याय : मजकुराचा आकार बदलण्याची आणि रंग योजना स्थापन करण्याच्या पर्यायाची तरतूद केलेली आहे. उदाहरणार्थ या संकेत स्थळावर प्रवेश करण्यासाठी जर तुम्ही डेस्कटॉपचा वापर करीत असाल तर पडद्यावरील मजकूर काहीसा लहान दिसेल ज्यामुळे तो वाचणे कठीण होईल. अशा प्रसंगी स्पष्ट दिसण्यासाठी आणि सुलभ वाचनीयतेसाठी मजकुराच्या आकारात वाढ करणा-या पर्यायाचा तुम्ही वापर करू शकता.

वर्णनात्मक जोडण्यांचा मजकूर : मजकुराच्या जोडणीनुसार "अधिक वाचा" आणि "येथे क्लिक करा" या शब्दाचा वापर न करता वर्णनात्मक वाक्प्रयोगाचा वापर करून संक्षिप्त वर्णनाच्या जोडणीची तरतूद करण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ जर जोडणीने पीडीएफ फाईल उघडली, तर या फाईलचा आकार असलेले वर्णन विनिर्दिष्ट होईल. पुढे जोडणीने जर नवीन संकेत स्थळाचे तावदान उघडले तर तसेच वर्णन विनिर्दिष्ट होईल.

तक्त्याचे शीर्षलेख: तक्त्याची शीर्षे चिन्हित आणि एकत्रिकरणासह त्या त्या कोष्ठाच्या प्रत्येक रांगेमध्ये करता येतात. उदा. जर तक्त्यामध्ये 30 रांगा आणि 5 स्तंभ असतील तर दृष्टीहीन वापरकर्त्यास कोणत्या माहितीचा कोष्ठ कोणत्या शीर्षाशी संबंधित आहे हे ओळखणे कठीण होईल. अशा स्थितीत वापरकर्त्यासाठी सहाय्यकारी उपकरण जसे स्क्रीन रीडर जो कोणत्याही कोष्ठाचा स्तंभ शीर्षलेख वाचू शकतो.

शीर्षके: वेब पृष्ठाच्या आशयाचा मजकुराचे संघटन, वाचनीय संरचनेची तरतूद असलेली समर्पक शीर्षके आणि उपशीर्षके वापरून केले जाते. एच -1 मुख्य शीर्ष दर्शवितो त्या अर्थी एच – 2 हे उपशीर्ष दर्शविते. या शिवाय स्क्रीन रीडरच्या वापरकर्त्यांसाठी या संकेत स्थळामध्ये दडलेली शीर्षे आहेत. जी उत्कृष्ट वाचनीयतेसाठी स्क्रीन रीडरद्वारे वाचली जाऊ शकतात.

नावे: प्रत्येक वेब पृष्ठासाठी समर्पक नाव विनिर्दिष्ट करावे ज्यामुळे पृष्ठाचा आतील मजकूर ओळखणे तुम्हाला सोपे जाईल.

एपर्यायी मजकूर: दृष्टीहीन वापरकर्त्यांसाठी प्रतिमेला पर्याय म्हणून ‍संक्षिप्त वर्णनाची तरतूद केलेली आहे. जर तुम्ही मजकूर आधारित ब्राऊझर वापरत असाल किंवा प्रतिमा पाहण्याचा पर्याय बंद ठेवला असेल, तरीही प्रतिमेला पर्याय असणाऱ्या मजकुराच्या आधारे त्या पृष्ठावरील प्रतिमेबाबत जाणून घेता येईल.

एक्स्प्लीसीट फॉर्म लेबल असोसिएशन: टेक्स्ट बॉक्स, चेक बॉक्स, रेडीयो बटन आणि ड्रॉप डाऊन यादी अशा संबंधित नियंत्रकांना विशिष्ट लेबल दिले आहे. यामुळे सहायक उपकरणे आवश्यक लेबल चटकन ओळखू शकतात आणि वापरकर्त्याला आवश्यक माहिती सहज प्राप्त होऊ शकते.

सातत्यपूर्ण दिशादर्शक यंत्रणा : संपूर्ण पोर्टलवर सातत्यपूर्ण दिशादर्शक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सुगमतेचे पर्याय

पटलावरील मजकूर वाचणे आपल्याला कठीण वाटते का ? पटलावर दिसणारी माहिती स्पष्टपणे दिसू शकत नाही का ?

उत्तर "हो" असल्यास पटल प्रदर्शन नियंत्रणासाठी या संकेत स्थळावर पुरवण्यात आलेल्या सुगमता पर्यायाचा वापर करा. अधिक चांगली दृष्यमानता आणि वाचनीयता प्राप्त करण्यासाठी मजकुराचा आकार आणि रंगसंगती बदलण्याची सुविधा या पर्यायांद्वारे उपलब्ध आहे.

मजकुराचा आकार बदलणे

मजकुराचा आकार प्रमाणित आकारापेक्षा कमी अथवा जास्त करणे, हे मजकुराच्या आकार बदलाशी संबंधित आहे. वाचनीयतेवर प्रभाव पाडणारे 3 पर्याय तुम्हाला सुचवण्यात आले असून मजकुराचा आकार वाढवण्याची सुविधा हे पर्याय उपलब्ध करुन देतात. पर्याय पुढीलप्रमाणे -

विशाल: विशाल आकारामध्ये माहिती प्रदर्शित करतो.

मोठा: प्रमाणित आकारापेक्षा मोठया आकारात माहिती प्रदर्शित करतो.

मध्यम: माहिती प्रमाणित आकारात अर्थात मूळ आकारात प्रदर्शित करतो.

मजकुराचा आकार बदलण्यासाठी कोणत्याही पानाच्या वरच्या भागात "मजकूर आकार" या बटणावर क्लिक करा.