सारथी संस्थेची उद्दिष्ट्ये
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीच्या “रजिस्ट्रार ऑफ कंपनी (Registrar of Companies)" कडून मंजूर करण्यात आलेल्या “मेमोरेंडम ऑफ असोसिएशन (Memorandum of Association)” प्रमाणे कंपनीच्या स्थापनेमागील मुख्य उद्दिष्ट्ये ख़ालीलप्रमाणे आहेत :
1) मराठा, कुणबी, मराठा -कुणबी व कुणबी-मराठा व्यक्ती/कुटुंब (यापुढे लक्षित गट म्हणून उल्लेखित) यांचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाच्या अनुषंगाने सर्व बाबींचा अभ्यास करणे व तसे करून शासनाला त्यावरील उपाययोजना सुचविणे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेची भारतातील एक दर्जेदार संशोधन, प्रशिक्षण आणि मानवी विकास संस्था म्हणून जडण-घडण करणे आणि लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी विविध संशोधन, प्रशिक्षण, मानव विकास व इतर कार्यक्रम हाती घेणे.
2) लक्षित गटांची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विविध सर्वेक्षण, कृती संशोधनासहित संशोधन, मूल्यमापन, रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता, कृषी संबंधित व इतर औद्योगिक व्यवसायांची स्थापना व विकास यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण व क्षमता, वृद्धी, माहिती संग्रह, ग्रंथालये, ज्ञानकोष, कृषी, सहकार क्षेत्रासह इतर अनेक अभ्यासवर्ग व समन्वयवर्ग तसेच अध्ययन संस्था, विविध क्षेत्रातील प्रशिक्षण व शैक्षणिक केंद्रे स्थापित करणे व विकसित करणे आणि चालवणे. विद्यार्थी, उद्योजक, शेतकरी व महिलांसाठी मार्गदर्शन व समुपदेशन केंद्रे सुरू करणे आणि विविध शिष्यवृत्ती, अधिछात्रवृत्ती, वेतनमान व पुरस्कार सुरू करणे व प्रदान करणे.
3) नागरिकांचे संविधानिक हक्क व कर्तव्ये, राष्ट्रीय एकात्मता व वैज्ञानिक दृष्टिकोन यांना प्रोत्साहन, शांती, जातीय सलोखा व धार्मिक सद्भावना, बंधुता यांना प्रोत्साहन, समता व सामाजिक न्याय, लिंगभेद, जातिभेद, वर्णभेद, अंधश्रद्धा यांचे निर्मूलन, स्वच्छता व आरोग्यासाठी घ्यायची खबरदारी. आंतरजातीय विवाह, सामूहिक विवाह, साधे विवाह, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण यांना प्रोत्साहन, हुंडा पद्धती, जातपंचायती, सामाजिक बहिष्कार, कौटुंबिक हिंसाचार यांचा विरोध यासाठी कृती संशोधन व विविध कार्यक्रम, उपक्रम इत्यादी हाती घेणे. तसेच सर्व प्रकारच्या प्रसार माध्यमांच्या मदतीने उपरोक्त क्षेत्रासंबंधी जाणीव जागृती व शैक्षणिक कार्यक्रम राबविणे.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीच्या "रजिस्ट्रार ऑफ कंपनी (Registrar of Companies)" कडून मंजूर करण्यात आलेल्या "मेमोरँडम ऑफ असोसिएशन (Memorandum of Association)" प्रमाणे मुख्य उद्दिष्टांच्या पूर्तिसाठी पूरक उद्देश:
- कंपनीच्या उद्दिष्टांची पूर्ति करण्यासाठी निधी उभारण्यासाठी आवाहन करणे, प्रस्ताव पाठवणे तसेच ट्रस्ट, सोसायटी, राज्य व केंद्र सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, संस्था, सरकारी व निमसरकारी संस्था अथवा व्यक्ती यांच्याकडून दान, बक्षीसपत्र, वारसापत्र, अनुदान अशा सर्व प्रकारची वैध आर्थिक मदत स्विकारणे व तिचा वापर करणे.
- कंपनीचा कारभार चालविण्यासाठी नियमावली व अनुशासन संहिता बनवणे आणि तिच्यात वेळोवेळी आवश्यक बदल व सुधारणा करणे.
- लक्षित गटांच्या विकासासाठी राष्ट्रीय पातळीवरील आदर्श संस्था (Model Institute) स्थापन करणे, तिचा विकास करणे व तिला चालविणे.
- कंपनीच्या उद्दिष्टांच्या पूर्तिसाठी स्वतः नियोजन करणे, विविध कार्यक्रम उपक्रम योजना हाती घेणे किंवा संचालक मंडळाच्या संमतीने इतर संस्था, कंपनी, सरकारी-निमसरकारी संस्था वा इतर खाजगी क्षेत्रातील संघटना, एजन्सी, किंवा युवक-युवती समूह/स्वयंरोजगार गट/उद्योजक यांच्या सहकार्याने किंवा त्यांच्या मार्फत किंवा त्यांना प्रोत्साहनाद्वारे विविध कार्यक्रम, उपक्रम आणि योजना राबवणे.
- सरकारी-निमसरकारी संस्था वा इतर खाजगी क्षेत्रातील संघटनांच्या सहकार्याने किंवा स्वबळावर कंपनीच्या उद्दिष्टांना मदत करणारे विविध कार्यक्रम हाती घेणे.
- दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संवाद-सूचना कौशल्य, व्यक्तीमत्व कौशल्य माहिती, इंग्रजीसहित इतर भाषांवर प्रभुत्व, आत्मविश्वास वृद्धी, व्यावसायिक मार्गदर्शन, समुपदेशन, कौशल्य, नैसर्गिक कल इत्यादी विविध कार्यक्रम हाती घेणे.
- लक्षित गटांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी संशोधनाच्या संकलन आणि माहितीचे व प्रसारणासाठी शिखर संस्था म्हणून कार्यरत रहाणे.
- विविध समस्यांवर जाणीव जागृतीसाठी किसान मित्र, कौशल्य विकासदूत, तारादूत (महिला सक्षमीकरण दूत), संत गाडगे बाबा दूत (स्वच्छता व व्यसनमुक्ती दूत), संविधान दूत, सावित्री दूत इत्यादी विशेष व पथदर्शी प्रकल्प वेळोवेळी हाती घेणे.
- देशातील संरक्षण विभाग, न्याय विभाग तसेच इतर सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आणि देशाबाहेरील रोजगार संधींचा लाभ लक्षित गटांना मिळावा यासाठी निवासी वा अनिवासी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम स्वबळावर, स्वतंत्रपणे किंवा इतर संस्थाच्या सहकार्याने हाती घेणे किंवा प्रायोजिक तत्वावर राबवणे.
- लक्षित गटांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी कृती, प्रायोगिक व धोरणात्मक संशोधन हाती घेणे तसेच स्थानिक, राज्य व राष्ट्रीय पातळीवर सुयोग्य कल्पना व संकल्पना विकसित करणे आणि पर्यायी धोरणे तयार करणे व सुचविणे.
- लक्षित गटांच्या विकासासाठी कृषी क्षेत्रातील व कृषी क्षेत्रासंबंधित तसेच कृषी उत्पादनाची प्रक्रिया, सहकारी उपक्रम, प्रक्रिया, मूल्यवृद्धी, ब्रॅडींग, उर्ध्व व अधो-दुवे (backward and forward linkages), मार्केटींग, निर्यात इत्यादी बाबत तसेच माती, पाणी व कृषी पिकांचे जनुक पूल (gene pool) व जैविक विविधताचे संवर्धन, इत्यादी क्षेत्रातील अशा व इतर कृषी व कृषी-संलग्न क्षेत्रातील संशोधनाच्या समन्वय, सूचना, माहिती व प्रशिक्षण यासाठी गुणवत्ता केंद्र (Centre for Excellence) स्थापित करणे.
- शेतकऱ्यांना शेती विषयक, गरजेप्रमाणे, समयोचित, मागणीप्रमाणे सल्ला व माहिती देणे आणि शेतकरी गटांना स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच संधारणीय कृषी प्रणालींच्या अवलबंन व सक्षमीकरणासाठी पिक प्रणाली, कृषी प्रणाली, कृषी, प्रक्रिया, मूल्यवृद्धी, मार्केटींग इत्यादींसंबंधित अभ्यास, संशोधन, डेटा मायनिंग इत्यादींचे नैपुण्य एकत्र करण्यासाठी ई-गव्हर्नन्सच्या तत्वांवर आधारित संसाधन व संशोधन केद्र स्थापन करणे, विकसित करणे व कार्यरत ठेवणे.
- शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील आधुनिक तत्वज्ञानाची माहिती प्रसारण करणे, सामूहिक कृषी, अचूक कृषी, सुरक्षित शेतीसाठी वापर तसेच लागवड, साठा, प्रक्रिया, मार्केटींग, शेतकऱ्यांना उपभोक्ता / ग्राहकांशी सरळ संबंध जोडून साखळी निर्मिती, निर्यात, इत्यादीसाठी जाणीव जागृती करणे व त्यासाठी प्रोत्साहन देणे.
- कृषी अर्थव्यवस्था, संधारणीय वा टिकाऊ कृषी यांच्या विविध पैलूंचा अभ्यास करून कृषी क्षेत्राला शासकीय मदतीसाठी अधिक सबळ व परिणामकारक धोरणे आखण्यासाठी व्यापक डेटा विकसित करणे.
- कृषी पिकांचे जनुक पूल (Gene Pool), कृषी पिकांची व पाळीव प्राण्यांची जैविक विविधता यांच्यावर स्वतः किंवा इतर संस्थांच्या सहकार्याने संशोधन व नोंदणी कार्य हाती घेणे.
- ग्रामीण क्षेत्रातील समस्या, शेतीविषयक समस्या, व्यसनाधिनता यांच्यावर स्वतः किंवा इतर संस्थांच्या सहकार्याने संशोधन उपक्रम हाती घेणे. या क्षेत्रातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी व ताणतणाव कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विविध जाणीव जागृती कार्यक्रम, उपक्रम, प्रशिक्षण, समुपदेशन, इत्यादी हाती घेणे.
- लक्षित गटांसाठी ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन, कृषी-वन पर्यटन, वन पर्यटन यासाठी माहिती व प्रशिक्षणासाठी स्वबळावर किंवा इतर संघटनांच्या सहकार्याने कार्यक्रम हाती घेणे.
- प्रशिक्षित मनुष्यबळाच्या आधारे तसेच इलेक्ट्रॉनिक, छापील साहित्य, सोशल मिडिया, हेल्पलाईन, माहिती व समुपदेशन केंद्र यांचा वापर करून कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेल्या लक्षित गटांतील कुटुंबांसाठी समुपदेशन, माहिती, प्रेरणादायक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम हाती घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवणे.
- राज्यातील शेत जमिनीच्या संवर्धन व संधारणासाठी माहिती व शिक्षणासाठी जमीनदल (Land Cadre) तयार करणे.
- कौशल्य विकास प्रशिक्षण सेवा संस्थांच्या निवडीसाठी, प्रशिक्षण खर्च, वेतनमान, प्रशिक्षणार्थींसाठी निःशुल्क निवास व भोजन यांचे खर्च या सर्वांच्या मूल्यमापनासाठी तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांच्या मूल्यमापनासाठी संशोधन, सर्वेक्षण, डेटा गोळा करणे व तज्ञांच्या मदतीने वेळोवेळी उपरोक्त बाबींचे निकष ठरविणे.
- रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता, लघु व मध्यम उद्योगांना सुरू करणे यासाठी लक्षित गटांच्या अनुलक्षून विविध कौशल्यविकास योजना स्वबळावर किंवा प्रशिक्षण संस्थाच्या माध्यमातून तयार करणे व राबविणे.
- कार्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या (Corporate Social Responsibility) अंतर्गत निधी उभा करणे व त्याचा वापर लक्षित गटांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी आणि त्यासाठी पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी करणे.
- संस्थात्मक दुवे जोडून, डेटा मायनिंग, कार्यशाळा, संमेलन, चर्चासत्र, शैक्षणिक सहली, सर्वेक्षण, परिषद इत्यादींच्या द्वारे ज्ञानकोष विकसित करणे व त्याला अद्ययावत ठेवणे.
- लक्षित गटातील नववी, दहावी, अकरावी व बारावीतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी आणि त्यांना परिक्षेत यशस्वी होण्यासाठी विशेष प्रशिक्षण योजना हाती घेणे.
- एम फिल, डॉक्टरेट, पोस्ट-डॉक्टरेट अशा व इतर विविध उच्चशिक्षणासाठी लक्षित गटांतील विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देणे.
- लक्षित गटांतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विदेशात संशोधन व उच्चशिक्षणासाठी राजर्षी शाहू विदेश अधिछात्रवृत्ती सुरू करणे आणि ती सुयोग्य विद्यार्थांना प्रदान करणे.
- लक्षित गटांतील सदस्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षांसाठी, व्यावसायिक शिक्षणासाठी, प्रवेश परिक्षांसाठी, विदेशी शिक्षणासाठी असणाऱ्या प्रशिक्षण व शिकवण्यांसाठी विविध योजना, कार्यक्रम, आराखडे, मानसशास्त्रीय चाचण्या, एप्टीट्यूड टेस्ट इत्यादींच्या वापरासाठी प्रोत्साहन देणे व त्यांचे प्रायोजन करणे, तसेच विशेषेकरून लक्षित गटांतील मुलींसाठी अशा योजना, आराखडे, कार्यक्रम यांची अंमलबजावणी करणे.
- अनुसूचित जाती व अनुसूचित जमाति (अत्याचार प्रतिबंधक) कायदा 1989 यावर सर्व संबंधित समाजघटकांसाठी प्रशिक्षण, चर्चासत्रे, कार्यशाळा, संमेलन, माहिती कार्यक्रम आयोजित करणे आणि या कायद्याच्या अंमलबजावणीच्या विविध पैलूंसंबंधी संशोधन करणे.
- शेतकरी व महिलांतील दुर्बल गटांसाठी हेल्पलाईन व समुपदेशन केंद्रे सुरू करणे आणि त्यांचे प्रबंधन करणे.
- नागरिकांचे संविधानिक हक्क व कर्तव्ये, राष्ट्रीय एकात्मता व वैज्ञानिक दृष्टिकोन यांना प्रोत्साहन. शांती, जातीय सलोखा व धार्मिक सद्भावना, बंधुता यांना प्रोत्साहन, समता व सामाजिक न्याय, लिंगभेद, जातिभेद, वर्णभेद, अंधश्रद्धा यांचे निर्मूलन. स्वच्छता अभियान, आंतरजातीय विवाह, सामूहिक विवाह, साधे विवाह, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण यांना प्रोत्साहन. हुंडा पद्धती, जातपंचायती, सामाजिक बहिष्कार, कौटुंबिक हिंसाचार यांचा विरोध यासंबंधी संशोधन कार्य हाती घेणे, त्यांची सूचना व माहिती यासाठी शैक्षणिक कार्यक्रम हाती घेणे. त्यासाठी या क्षेत्रांत प्रशिक्षणे, व्याख्याने, कार्यशाळा, परिषदा, चर्चासत्रे, शैक्षणिक सहली, भेटी, आकाशवाणीवर व्याख्याने, दूरचित्रवाणीवर कार्यक्रम, वेगवेगळे नाट्यप्रकार यासारख्या विविध योजना व कार्यक्रम हाती घेणे.
- वरील क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार सुरू करणे व प्रदान करणे.
- वरील क्षेत्रांशी संबंधित विषयांवर वेगवेगळ्या पातळ्यांवर विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा व इतर कार्यक्रमांचे आयोजन करणे, तसेच सुयोग्य विद्यार्थ्यांसाठी पारितोषिके, पुरस्कार, गौरवपत्र देणे जेणेकरून त्यांना भारताचे आदर्श नागरीक बनविण्यासाठी प्रेरणा मिळेल.
- विविध योजनांच्या मूल्यमापन, पर्यवेक्षण व देखरेखीसाठी प्रमाण दर्जा तयार करणे व सुचविणे, तसेच लक्षित गटांतील घटकांच्या विकासासाठी विविध योजना व आराखडे यांच्या अंमलबजावणीच्या समवर्ती मूल्यमापनासाठी व इतर प्रकारच्या मूल्यमापनासाठी तसेच सरकारी, निमसरकारी व अशासकीय/खाजगी क्षेत्रातील संस्थांच्या योजनांच्या समवर्ती मूल्यमापनासाठी व इतर प्रकारच्या मूल्यमापनासाठी सल्लागार तत्वावर कार्य करणे.
- वेगवेगळ्या समाजघटकांसाठी सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास सूचकांक तयार करणे आणि त्यासाठी त्या अनुषंगाने संबंधित सर्वेक्षण व संशोधन प्रकल्प हाती घेणे, तसेच यासंदर्भात महाराष्ट्र मागासवर्गीय आयोगाला सल्ला सेवा देणे.
- लक्षित गटांतील व इतर व्यक्ती तसेच कुटुंबांची डेटाबॅंक तयार करणे, विकसित करणे व अद्ययावत ठेवणे जेणेकरून लक्षित गटांच्या विकासासाठी अधिक उत्तम योजनांसाठी कल्पना व संकल्पना मांडता येतील.
- महिलांच्या प्रगतीसाठी व सबलीकरणासाठी क्षमता वृद्धी सारखे व इतर विशिष्ट प्रकल्प हाती घेणे. विविध कार्यक्रमांचे आयोजन व प्रायोजन (प्रायोजिक तत्वावर आयोजन) करणे आणि प्रशिक्षण देणे, तसेच गुणवत्ताधारक महिलांना/मुलींना आरोग्य क्षेत्र, क्रिडा क्षेत्र, कला व हस्तकला आणि इतर नाविन्यपूर्ण क्षेत्रे यांत प्रगतीसाठी आर्थिक पाठबळ देणे.
- जेथे सर्व जाती, वर्ण, पुरूष-महिला, व्यावसायिक यांना पुस्तके, माहितीपुस्तिका, माहितीपत्रिका, नियतकालिके, मायक्रोफिल्मस्, छायाचित्रे, चलचित्रे, ध्वनिमुद्रण व इतर माध्यमातून अध्ययन व संशोधन करण्यासाठी सुविधा असेल अशा ग्रंथालयांची तालुका, जिल्हा पातळीवर स्थापना करणे व त्यांची देखरेख करणे, प्रबंधन करणे.
- राज्यातील विविध ठिकाणच्या ग्रंथालयांना व अभ्यासिकांना मदत करणे तसेच त्यांना व ग्रामपंचायतींना व इतर ठिकाणी वरील क्षेत्रातील संबंधित पुस्तके, माहितीपुस्तिका, पत्रके, पोस्टर्स— छापील तसेच दृकश्राव्य सामग्री पुरविणे.
- राजर्षी शाहू राष्ट्रीय सार्वजनिक ग्रंथालय’ नावाची राष्ट्रीय पातळीवरील ग्रंथालयाची स्थापना करणे व खालील उद्देशांसाठी ते अद्ययावत ठेवणे: -
- अ. सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांना संदर्भग्रंथांसाठी, संशोधनासाठी आणि घरी नेण्यासाठी सुविधा.
- आ. संशोधकांसाठी, शिक्षणक्षेत्रातील व्यक्तींसाठी व जनतेसाठी संदर्भ, संशोधन आणि घरी नेण्यासाठी सुविधा.
- इ. इतर प्रमुख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ग्रंथालयांशी संलग्न होऊन वरील घटकांना सुविधा उपलब्ध करून देणे.
- ई. यासंबंधित दृकश्राव्य, प्रदर्शन, परिषद व इतर सुविधा पुरवण्यासाठी गरजेचे कार्यक्रम हाती घेणे.
- नागरिकांचे संविधानिक हक्क व कर्तव्ये. राष्ट्रीय एकात्मता व वैज्ञानिक दृष्टिकोन यांना प्रोत्साहन. शांती, जातीय सलोखा व धार्मिक सद्भावना, बंधुता यांना प्रोत्साहन, समता व सामाजिक न्याय. लिंगभेद, जातिभेद, वर्णभेद, अंधश्रद्धा यांचे निर्मूलन. स्वच्छता अभियान, आंतरजातीय विवाह, सामूहिक विवाह, साधे विवाह, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण यांना प्रोत्साहन. हुंडा पद्धती, जातपंचायती, सामाजिक बहिष्कार, कौटुंबिक हिंसाचार यांचा विरोध यासंबंधी व या विषयांशी निगडीत बाबींत संशोधन कार्य हाती घेणे व प्रायोजित करणे, या बाबींसंबंधी सूचना व माहिती यासाठी विविध छापील साहित्य (पुस्तके, ग्रंथ, पुस्तिका, पोस्टर्स, पत्रके, नियतकालिके, मासिके, वृत्तपत्रे, छायाचित्रे इ.), चलचित्रादि दृकश्राव्य सामग्री, संगणकीय साहित्य, तसेच इतर साहित्य प्रकाशित करणे, पुरविणे, विकणे, निःशुल्क वितरण करणे आणि प्रदर्शित करणे.
- उपरोक्त विषयांत युवक युवतींच्या सूचना व माहितीसाठी, त्यांच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी विविध शैक्षणिक व प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेणे.
- उपरोक्त विषयांच्या सूचना व माहितीसाठी छापील साहित्य, दृकश्राव्य साहित्य, संगणकीय सामग्री व सोशल मिडिया आदिच्या आधारे विविध शैक्षणिक व प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेणे.
- कंपनीच्या उद्दिष्ट्यपूर्तिसाठी विविध सर्वेक्षणे, संशोधन, अभ्यास प्रकल्प, भाषांतरे, लिखाण, पुस्तके यांचे व्यक्ती व संस्था यांना प्रायोजन करणे.
- वेगवेगळ्या ठिकाणी ‘राजर्षी शाहू अभ्यास गट’ स्थापन करणे.
- राजर्षी शाहू, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगे बाबा, ताराबाई शिंदे, छत्रपती संभाजी महाराज, संत तुकाराम व इतर समाजसुधारकांच्या जीवन व शिकवणुकीवर चलचित्रपट तयार करणे किंवा प्रायोजित करणे.
- राजर्षी शाहूंच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि त्यांच्या कार्याची ओळख रहावी म्हणून कार्यरत संस्थांना आर्थिक मदत करणे व त्यासाठी समाजमंदिरे, कार्यालये इत्यादी बांधणे.
- कंपनीच्या उद्दिष्टांना पोषक क्षेत्रात व कार्यांत व्यक्ती, सरकारी-निमसरकारी संस्था, खाजगी संस्था यांना मदत करणे, व विशेष करून प्रोत्साहन देणे.
- लक्षित गटांतील विद्यार्थ्यांना विशेषेकरून महिलांना/मुलींना दहावी ते पदव्युत्तर तसेच उच्च शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्ती, पुरस्कार, वेतनमान, बक्षीस, अधिछात्रवृत्ती इ देणे तसेच इतर आर्थिक आदी मदत करणे.
- ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व त्यावरील उपाययोजना यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम हाती घेणे.
- नागरिकांचे संविधानिक हक्क व कर्तव्ये. राष्ट्रीय एकात्मता व वैज्ञानिक दृष्टिकोन यांना प्रोत्साहन. शांती, जातीय सलोखा व धार्मिक सद्भावना, बंधुता यांना प्रोत्साहन, समता व सामाजिक न्याय. लिंगभेद, जातिभेद, वर्णभेद, अंधश्रद्धा यांचे निर्मूलन. स्वच्छता अभियान, आंतरजातीय विवाह, सामूहिक विवाह, साधे विवाह, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण यांना प्रोत्साहन. हुंडा पद्धती, जातपंचायती, सामाजिक बहिष्कार, कौटुंबिक हिंसाचार यांचा विरोध यासंबंधी व या विषयांशी निगडीत विषयांत विशिष्ट प्रकल्प व प्रचार मोहिमा इ. हाती घेणे. यासाठी विविध शैक्षणिक प्रकल्प हाती घेणे तसेच सूचना व माहिती कार्यक्रम, प्रशिक्षणे, व्याख्याने, परिषदा, शैक्षणिक सहली, भेटी, चर्चा-सत्रे, आकाशवाणीवर चर्चा, दूरचित्रवाणीवर कार्यक्रम, विविध नाट्यप्रकार इत्यादींचे आयोजन करणे. या कार्यक्रमांना मदत करणे, त्यासाठी सरकारी, निमसरकारी व खाजगी क्षेत्रातील संस्था व व्यक्ती यांना आर्थिक मदत करणे, तसेच त्यांच्या सहकार्याने संबंधित क्षेत्रात कार्य हाती घेणे.
- उपरोक्त क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करणाऱ्या संस्थांना व व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी गौरवपत्र व मानचिह्नासहीत रू. दहा लाख चा राजर्षी शाहू राष्ट्रीय पुरस्कार सुरू करणे व प्रदान करणे.
- सारथी संस्थेच्या लक्ष्य व उद्दिष्टांना पूरक असे, तसेच राजर्षी शाहू, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगे बाबा, छत्रपती संभाजी महाराज, संत तुकाराम, महर्षी वि. रा. शिंदे, ताराबाई शिंदे आदि समाजसुधारक तसेच लक्षित गटांच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक व शैक्षणिक चळवळी यांवर वस्तुसंग्रहालये उभारणे, त्यांचे व्यवस्थापन पहाणे व त्यांना अद्ययावत ठेवणे.
- समाजसुधारकांशी निगडीत स्थळे व वास्तूंना ताब्यात घेणे, त्यांची देखभाल करणे व त्यांचे संरक्षण करणे. त्यांची स्मारके उभारणे तसेच उचित समारंभ व कार्यक्रम यांचे आयोजन करणे.
- परंपरागत कृषी प्रणाली व कृषक समाजघटकांच्या नैतिक मूल्ये, कला व हस्तकला, विविध काव्यप्रकार व नाट्यप्रकार, मोडी लिपीसहीत भाषा व साहित्य अशा सांस्कृतिक ठेव्यांचे जतन करणे आणि त्यासंबंधित सर्व प्रकारची ऐतिहासिक व इतर सामग्रीचे संकलन करणे.
- राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्याशी संबंधित सर्व व्यक्तिगत कागदपत्रांचे, ऐतिहासिक दस्तावेजाचे तसेच त्यांच्या राज्यकारभार संबंधित आज्ञापत्रे इत्यादींचे संकलन करणे व संरक्षण करणे. तसेच, त्यांचे प्रकाशन करणे.
- कंपनीच्या उद्दिष्टांच्या पूर्तिसाठी कंपनीशी संलग्न विद्यार्थी, विद्वान व संस्था अतिविशिष्ट प्रकल्पांसाठी, सर्वेक्षणांसाठी व संशोधनासहीत इतर व्यावसायिक कार्याला आर्थिक व इतर सामग्रीच्या स्वरूपात मदत देण्यासाठी विविध पुरस्कार, बक्षीस, शिष्यवृत्ती, अधिछात्रवृत्ती, वेतनमान सुरू करणे व प्रदान करणे.
- कंपनीच्या उद्दिष्टांसाठी खरेदीतत्त्वावर वा भाडेतत्त्वावर वा इतर प्रकारे करारनामा करून जमीन, इमारती, कार्यशाळा, प्रयोगशाळा, यंत्रे, उपकरणे, वैज्ञानिक दस्तावेज, साधने, चित्रे, डेटा, प्रायोगिक डेटा, ग्रंथालये, वृक्षसंपदा आणि सर्व प्रकारचे विशेषाधिकार यांना तात्पुरत्या किंवा कायम स्वरूपी तसेच गरजेप्रमाणे व सुविधेनुसार चल व अचल मालमत्ता संपादन करणे आणि कंपनीच्या उद्दिष्टांसाठी कुठल्याही इमारतींचे बांधकाम, निर्मितीकार्य, जीर्णोद्धार वा इतर बदल, देखभाल इत्यादी कार्य हाती घेणे तसेच कंपनीच्या कुठल्याही चल-अचल मालमत्तेची देखभाल करणे, विकसन करणे, विकणे, भाडेतत्त्वावर देणे, गहाण ठेवणे किंवा अन्य प्रकारे त्यांचा, आर्थिक वा इतर मोबदल्यात, अंशतः वा पूर्णतः उपयोग करणे वा त्यांची विल्हेवाट लावणे.
- भारतात व भारताबाहेर कंपनीच्या शाखा स्थापन करणे, त्यांचे नियंत्रण करणे व व्यवस्थापन पहाणे.
- कंपनीच्या उद्दिष्टांसाठी कंपनीच्या मालमत्तेवर योग्य त्या प्रकारे गहाणवटीने, अंशतः वा पूर्णतः कुठल्या मालमत्तेची विल्हेवाट लावून वा अन्यथा आर्थिक निधी उसनवार घेणे वा उभा करणे.
- कंपनीच्या उद्दिष्टांसाठी “Promissory Notes”, “Bills of Exchange” तसेच इतर “Negotiable, Transferable Instruments” इत्यादींद्वारे सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार करणे.
- कंपनीच्या उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी कुठल्याही भारतीय वा विदेशी संस्थेशी “Joint Venture, Collaboration, Partnerships” इ. साठी करारनामा करणे.
- कंपनीच्या नावे भारतीय वा विदेशी बॅंकांत किंवा इतर आर्थिक संस्थांत वैध प्रकारे सर्व लागू नियम-कायद्यांनुसार खाते उघडणे.
- कंपनीच्या उद्दिष्टांसाठी आवश्यक वाटल्यास वेळोवेळी कुठल्याही कार्यक्रमाला, प्रकल्पाला, विशिष्ट प्रकल्पांना, आराखड्यांना हाती घेण्यासाठी, त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी व अंमलबजावणी करण्यासाठी ट्रस्ट आणि/ किंवा सोसायटी स्थापन करणे व त्यांचे व्यवस्थापन बघणे तसेच त्यासाठी योग्य आर्थिक निधी उपलब्ध करून देणे.
- कंपनीच्या आस्थापनासाठी व कंपनीच्या उद्दिष्टांसाठी विविध प्रकारचे मनुष्यबळ मिळविणे. ह्या मनुष्यबळात तज्ञ, प्रशिक्षक, व्यवस्थापक, संयोजक, नोकरशहा, प्रकल्प संचालक, वैज्ञानिक, विद्वान व विदुषी, लेखक, भाषांतरकार, सल्लागार, समुपदेशक, तंत्रज्ञ, कायदातज्ञ, समाजसेवक, दूत, शिक्षणतज्ञ, मनोविकारतज्ञ, ध्यानशिक्षक व इतर मानसिक आरोग्य तज्ञ, तसेच इतर सर्व कर्मचारी वर्ग यांचा समावेश असेल. तसेच कंपनीला योग्य वाटेल असे सर्व व्यवस्थापन, पर्यवेक्षण इत्यादी हाती घेणे.
- लक्षित गटांच्या सदस्यांसाठी, त्यांना त्यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी नवनवीन कल्पना व संकल्पना तयार करण्यास सहाय्यभूत होण्यासाठी, राज्यात व राज्याबाहेर विविध भेटी आणि शैक्षणिक सहली आयोजित करणे.
- लक्षित गटांतील व्यक्तींसाठी देशात व देशाबाहेर शैक्षणिक क्षेत्रात मनुष्य बळाच्या व संशोधनाच्या देवाणघेवाणींना मदत करणे.
- भारतात व भारताबाहेर कंपनीच्या उद्दिष्टे व कार्यक्रम यांत समानता असलेल्या योजनांमध्ये कार्यरत संस्थांशी सहकार्य करणे.
- कंपनीच्या उद्दिष्टांच्या संबंधित सर्व क्षेत्रांत कुठल्याही सरकारी, निमसरकारी व खाजगी क्षेत्रातील संस्थांना मदत करणे.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचे व त्यांच्या संबंधित ऐतिहासिक स्थानांचे संशोधन व डॉक्युमेंटेशन प्रकल्प हाती घेणे.
- कंपनीच्या स्थापना, नोंदणी, पंजीकरण, सूचना यांसाठी व त्या अनुषंगाने जो काही खर्च होईल तो, तसेच कुठल्याही सूचना, परिपत्रक, छपाई, स्टॅंप फी व इतर फॉर्म, प्रॉक्झी आदीसाठी आणि कुठल्याही व्यक्तीला, संस्थेला, इतर कंपनीला त्यांनी कंपनीला दिलेल्या सर्व प्रकारच्या सेवांसाठी कंपनीच्या निधीतून मोबदला देणे वा त्यांची आर्थिक भरपाई करणे.
- कंपनीच्या उद्दिष्टांशी मिळतीजुळती उद्दिष्टे असणाऱ्या कुठल्याही सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील संस्था, इतर कंपनी, संघटना, मंडळ इत्यादींना भारतात व भारताबाहेर कंपनीच्या वेळोवेळी तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सल्लागार सेवा पुरवणे.
- कंपनीच्या उद्दिष्टांना पुढे नेण्यासाठी विविध परिषदा, कार्यशाळा, चर्चासत्रे, प्रदर्शने आदी यांचे आयोजन करणे व अशा प्रकारच्या कार्यक्रमांत भाग घेणे.
- भारतातील कंपनीच्या उद्दिष्टांशी मिळतीजुळती उद्दिष्टे असणाऱ्या सर्व संस्थाशी जाळे (network) तयार करणे.
- समाजातील विविध घटकांत सामंजस्य निर्माण करण्यासाठी अभ्यासाचे कार्यक्रम, संकल्पनांच्या चर्चा व देवाणघेवाणी यांचे संयोजन करणे.
- उद्योजकता, कौशल्य विकास, जलसंधारण व मृद्संधारण, रोजगार निर्मिती तसेच नागरिकांचे संविधानिक हक्क व कर्तव्ये. राष्ट्रीय एकात्मता व वैज्ञानिक दृष्टिकोन यांना प्रोत्साहन. शांति, जातीय सलोखा व धार्मिक सद्भावना, बंधुता यांचे संवर्धन. समता व सामाजिक न्याय. लिंगभेद, जातिभेद, वर्णभेद, अंधश्रद्धा यांचे निर्मूलन. स्वच्छता अभियान, आंतरजातीय विवाह, सामूहिक विवाह, साधे विवाह, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण यांना प्रोत्साहन. हुंडा पद्धती, जातपंचायती, सामाजिक बहिष्कार, कौटुंबिक हिंसाचार यांचा विरोध यासंबंधी व या विषयांशी निगडीत बाबींवर. स्वबळावर स्वतंत्रपणे किंवा इतर संस्था वा विद्यापीठे यांच्या सहकार्याने. पदविका, पदवी व प्रमाणपत्र अभ्यासक्रम हाती घेणे.
- लक्षित गटांसाठी तसेच समाजातील कमजोर वर्गांसाठी, विशेषतः कमी साक्षरता असलेल्या भागांत विविध क्षेत्रांत, विषयांत दर्जेदार शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था स्थापन करणे आणि त्यांचे प्रबंधन करणे.
- छत्रपती शाहू महाराजांच्या व इतर समाजसुधारकांच्या जीवनकार्याशी निगडीत महत्त्वाच्या दिवशी सभा-समारंभ, व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्रे, परिषदा, स्पर्धा, क्रिडा कार्यक्रम, सोहळे, सूचना व माहिती कार्यक्रम, भेटी, प्रदर्शने, छापील व इलेक्ट्रॉनिक साहित्याचे निःशुल्क वाटप करणे व अशा कार्यक्रमांना हाती घेणाऱ्या संस्थांना प्रायोजित करणे किंवा त्यांच्याशी सहकार्य करणे.
- विद्यापीठामध्ये ‘राजर्षी शाहू न्यास’ स्थापन करणे व त्यांचा आस्थापन पाहणे.
- छत्रपती संभाजी महाराज, संत तुकाराम, राजर्षी शाहू, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगे बाबा, सयाजीराव गायकवाड, शहीद भगत सिंह, महर्षी वि. रा. शिंदे, ताराबाई शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी समाजसुधारकांच्या जीवनकार्यावर तसेच लक्षित गटांच्या संदर्भात महत्त्वाच्या सामाजिक व शैक्षणिक सुधारणा चळवळींचे अध्ययन व संशोधन यांचे नियोजन करणे, त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांना प्रायोजित करणे व असे कार्य हाती घेणे.
- कंपनीच्या उद्दिष्टांची सूचना व माहिती तसेच, जाहिरात करणे.
- शासनाद्वारा निश्चित केलेल्या वा नेमून दिलेल्या सर्व व कुठल्याही कार्य या हाती घेणे.
- कंपनीच्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी वैध मार्गाने जे-जे आवश्यक असेल ते सर्व कार्य हाती घेणे.