About Us

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी)

सारथी संस्थेविषयी थोडक्यात:

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही महाराष्ट्र शासनाची नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील दिनांक 25 जून, 2018 रोजी कंपनी कायदा 2013 च्या कलम 8 अन्वये स्थापन करण्यात आलेली नॉन-प्रॉफिट कंपनी आहे. महाराष्ट्र राज्यातील मराठा ,कुणबी, मराठा - कुणबी व कुणबी -मराठा या लक्षित गटातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकरिता या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील मराठा ,कुणबी, मराठा - कुणबी व कुणबी -मराठा या लक्षित गटातील समाजाची सामाजिक ,शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विविध सर्वेक्षण घेऊन कृती संशोधनाकरीता मूल्यमापन करणे व कार्यक्रमांच्या अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.संस्थेच्या स्थापनेमागील उद्दिष्टांचा विचार करता लक्षित गटाला सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी संशोधन करून माहितीचे संकलन व पृथ्थकरण करणारी “शिखर संस्था” म्हणून सारथी संस्था कार्यरत आहे .लक्षित गटाच्या समाजातील विविध समस्यावर जाणीव जागृती करून विशेष व पथदर्शी प्रकल्प वेळोवेळी हाती घेण्यात येत आहेत. सद्यस्थितीत लक्षित गटातील इच्छुक विद्यार्थ्यांना सारथी संस्थेमार्फत पोलीस भरती करता निशुल्क ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती अंतर्गत एम.फील व पीएच.डी. करणाऱ्या विद्याथ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे .छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथाच्या 5000 प्रतींची छपाई बालभारती या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. लक्षित गटातील इच्छुक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीने परिक्षेच्या तयारीसाठी विद्यावेतन देण्यात येत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा 2020 करिता लक्षित गटातील 59 विद्यार्थ्यांची झूम मीटिंग च्या माध्यमातून मुलाखत तयारी व अभिरूप मुलाखती घेण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) परीक्षेसाठी लक्षित गटातील विद्यार्थ्यांना "निशुल्क ऑनलाईन प्रशिक्षण सारथी संस्थेमार्फत घेण्यात येणार आहे.महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षा तयारीकरिता 250 विद्यार्थ्यांची निवड करण्याची प्रक्रिया सद्यस्थितीत चालू आहे.कर्मचारी निवड आयोग मार्फत अराजपत्रित पदांच्या स्पर्धा परीक्षेला बसलेल्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे.कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपूर्ण राज्यभर संस्थेच्या माध्यमातून राबविण्याची कार्यवाही सुरू आहे.

1.3 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीच्या रजिस्ट्रार ऑफ कंपनी (Registrar of Companies) कडून मंजूर केलेनुसार पदसिध्द सदस्य खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. पदनाम नांव

1

प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई

श्री. विकासचंद्र रस्तोगी

2

सचिव, कृषि  विभाग,मंत्रालय,मुंबई

श्री. एकनाथ डवले

3

अपर मुख्य सचिव, उद्योग,ऊर्जा व कामगार विभाग(उद्योग),मंत्रालय,मुंबई

श्री. बलदेव सिंह

4

सचिव, आदिवासी विकास विभाग,मंत्रालय, मुंबई

श्री.अनुप कुमार यादव

5

अपर मुख्य सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,(सामाजिक न्याय) मंत्रालय,मुंबई

श्री. अरविंद कुमार

6

सचिव, इतर मागास, बहूजन कल्याण विभाग, मंत्रालय,मुंबई

श्रीमती इंद्रा माल्लो

7

प्रधान सचिव, उद्योग,ऊर्जा व कामगार विभाग (कामगार) मंत्रालय,मुंबई

श्रीमती विनीता वेद-सिंघल

8

प्रधान सचिव, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग,मंत्रालय,मुंबई

श्रीमती मनिषा वर्मा

1.4 छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (साथी), पुणे या संस्थेची "कंपनी अधिनियम 2013 (Company Act २०१३) च्या कलम 8 अंतर्गत शासकीय हमी असलेली व भाग भांडवल नसलेली कंपनी म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन ,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीच्या रजिस्ट्रार ऑफ कंपनी (Registrar of Companies)" कडून मंजूर करण्यात आलेल्या "मेमोरंडम ऑफ असोसिएशन (Memorandum of Association)" व आर्टिकल ऑफ असोसिएशन (Article of Association)" प्रमाणे कंपनीच्या प्रशासकीय कर्तव्य व वित्तीय जबाबदारी पार पाडण्याची पर्यवेक्षीय दायित्व "संचालक मंडळ (Board of Director)" यांचेवर सोपविलेले आहे. नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. सारथी-2020/प्र.क्र./का. 425 दिनांक 15 ऑक्टोबर 2020 अन्वये संस्थेच्या संचालक मंडळाची संरचना खालीलप्रमाणे करण्यात आलेली आहे. नियोजन विभाग, शासन निर्णय के सारथी-2020/प्र.क्र.42/का 1425 दिनांक 15 ऑक्टोंबर 2020 अन्वये संस्थेच्या संचालक मंडळाची संरचना खालीलप्रमाणे करण्यात आलेली आहे.

नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. सारथी-2020/प्र.क्र.42/का.1425 दिनांक 15 ऑक्टोबर, 2020 अन्वये संस्थेच्या "संचालक मंडळाची" संरचना:
अ.क्र. नांव पदनाम शासनातील कार्यरत पद

.क्र.

नांव

पदनाम

शासनातील कार्यरत पद

1

श्री. अजित निंबाळकर

अध्यक्ष

-

2

श्री. मधुकर कोकाटे 

संचालक

-

3

श्री. उमाकांत दांगट

संचालक

-

4

डॉ. नवनाथ पासलकर

संचालक

-

5

श्री. सौरभ राव

संचालक

विभागीय आयुक्त, पुणे

6

श्री. दिपेंद्र सिंग कुशवाह

संचालक

आयुक्त, कौशल्य विकास

7

श्री. विशाल सोलंकी

संचालक

आयुक्त, शिक्षण

8

श्री. धिरज कुमार

संचालक

आयुक्त, कृषी

9

श्री. सचिंद्र प्रताप सिंग

संचालक

आयुक्त, पशुसंवर्धन

10

श्री. हणमल्लू तुम्मोड

संचालक

आयुक्त, दुग्धव्यवसाय

11

श्री. ओमप्रकाश बकोरीया

संचालक

आयुक्त, क्रीडा

12

श्री. अशोक काकडे

व्यवस्थापकीय संचालक

व्यवस्थापकीय संचालक, सारथी

1.5 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीच्या रजिस्ट्रार ऑफ कंपनी (Registrar of Companies)" कडून मंजूर करण्यात आलेल्या “मेमोरेंडम ऑफ असोसिएशन (Memorandum of Association)” प्रमाणे कंपनीच्या स्थापनेमागील मुख्य उद्दिष्ट्ये: